कंपनीकडून शहरात कचरा डंप करत असल्याचा आरोप करत एमआयएम अक्रामक, सिडको एन-12 येथे एमआयएमचा राडा...
कंपनीकडून शहरात कचरा डंप केल्याचा आरोप करत एमआयएम अक्रामक, सिडको एन-12 मध्ये राडा...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) - शहरातून कचरा उचलणारी खाजगी कंपनी सिडको एन-12 सलिम अली सरोवर शेजारील ओपन स्पेस वर कचरा डंप करत असल्याचा आरोप करत एमआयएम अक्रामक झाली आहे. आज सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील व विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या उपस्थितीत कच-याचे वाहन ग्राउंडच्या बाहेर काढले. कचरा प्रोजेक्टचे सुरू असलेले काम बंद पाडले. खाजगी कंपनीचे अधिकारी यांना कडक शब्दांत सांगितले यानंतर कचरा भरुन घंटा गाड्या व मोठे वाहन येथे आले तर फोडले जाईल असा इशारा विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी दिला आहे.
इम्तियाज जलिल यांनी सांगितले मनपा आयुक्त यांनी सांगितले होते. येथे दुर्गंधी येणार नाही आपण येथे बसून काॅफी पिऊ शकता परंतु आता येथे आलो असता कच-याच्या दुर्गंधीमुळे श्वास घेणे कठीण झाले आहे. तर मग येथील रहिवाशांची काय अवस्था होत असेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येवून बघावे. येथे सलिम अली सरोवर आहे त्या पाण्याची काय अवस्था झाली असेल, दोन धार्मिक स्थळ आहे. एक कॅन्सर हॉस्पिटल आहे. आजूबाजूच्या परिसरात निवासी घरे आहेत. या कच-याच्या दुर्गंधीमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरात कोणत्याही ठिकाणी कंपनीला कचरा डंप करु देणार नाही. शहराबाहेर जेथे निवासी घर वस्ती नाही तेथे खाजगी जागा कंपनीने शोधावी व तेथे कचरा डंप करुन प्रक्रिया करावी असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.
What's Your Reaction?