मनसे पार्कींगसाठी अक्रामक, मनपा समोर सुरू केले उपोषण...!

 0
मनसे पार्कींगसाठी अक्रामक, मनपा समोर सुरू केले उपोषण...!

मनसे पार्कींगसाठी अक्रामक, मनपा समोर सुरू केले बेमुदत उपोषण...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- शहरात सणासुदीच्या काळात खरेदी करताना वाहनांच्या पार्किंगमुळे वाद विवाद कारवाईमुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. मनपाने पार्कींगचे नियोजन करावे व विविध मागणीसाठी मनसेच्या वतीने मनपा समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

रोड वर उभे असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याआधी त्या ठिकाणी 5 मिनिटांआधी सूचना द्यावी, प्रथम नो पार्किंग झोन असा फलक लावावा. जोपर्यंत वाहनतळाची व्यवस्था होत नाही तोपर्यंत वाहनांवर होणारी कारवाई थांबवावी, दिवाळी सन तोंडावर आला आहे हिंदू बांधव खरेदीसाठी बाहेर पडणार आहे, त्यांच्या गाडीवर अद्याप कुठलीही कारवाई नको, सैनिकांचे ड्रेस घालून कार्यवाई करणा-या गायकवाड यांना निलंबित करावे, नो पार्किंगच्या कारवाईतून मिळालेल्या पैशांचा हिशोब वृत्तपत्रांच्या आधारे जनतेसमोर मांडावे, या सर्व मागण्या मनपा आयुक्त यांना मान्य नसेल तर उपोषण थांबवण्याचा प्रयत्न केल्यास मी. स्वतः आयुक्त यांच्या विरोधात गोदावरी नदीत जलसमाधी घेईल याला जबाबदार मनपा आयुक्त असतील असा इशारा मनसेचे मध्य विधानसभा विभाग अध्यक्ष चंदू नवापूते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याप्रसंगी जिल्हा संघटक रस्ते, साधन सुविधा व आस्थापना अशोक पवार, उपशहर अध्यक्ष गणेश साळुंके पाटील, उप शहर अध्यक्ष अविनाश पोफळे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow