सिध्दार्थ महाविद्यालयात रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न...!

 0
सिध्दार्थ महाविद्यालयात रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न...!

सिद्धार्थ महाविद्यालयात रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.27(डि-24 न्यूज)

सिद्धार्थ महाविद्यालय मिटमिटा पडेगाव येथे रस्ता सुरक्षा बाबत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती पूजा मनोहर वानखेडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील नागरिक व विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा .सुनील मगरे हे होते. यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती पूजा वानखेडे म्हणाल्या, पालकांनी मुलाच्या हाती नवीन गाडीच्या चाव्या देण्याआधी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतूक नियम समजावून सांगणे आवश्यक आहे. सुरक्षितता म्हणजे घोषणा नाही, जीवनाला सुरक्षित कसे ठेवावे ही एक शिकवण व मार्ग आहे . बाबा पेट्रोल पंप ते दौलताबाद पर्यंतचा रस्ता खूप वेगाने वाहतो या मार्गावर नेहमी अपघात होत असतात त्यामुळे पडेगाव आणि मिटमिटा या भागातील महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी वाहन सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

पुढे पूजा वानखेडे म्हणाल्या सिग्नलचे पालन करा , गाडी चालवतांनी मोबाईलवर बोलू नका, ड्रिंक करून गाडी चालू नका ,कानाला हेडफोन लावून गाडी चालू नका , गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा ,सिग्नलच्या योग्य तो वापर करा , ट्रिपल सीट गाडी चालू नका , फोर व्हीलर चालवताना शीट बेल्टचा वापर चालक आणि त्याच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने करणे आवश्यक आहे. या सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन करा असे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूजा वानखेडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे यांनी केले तर अध्यक्षीय भाषण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुनील मगरे यांनी केले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थी व नागरिकांनी वाहन चालवताना योग्य त्या नियमांचे पालन करण्यात यावे असे आवर्जून सांगितले. कार्यक्रमाचे संचलन प्रा. श्रीमती पूजा साळवे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. सोनाली मॅडम यांनी केला शेवटी डॉ. सुकेशनी जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ राजू वानखडे, प्रा पाईकराव, शुभम सदावर्ते , प्रा सुरज परघरमोर ,प्रा. स्मिता मगरे ,प्रा सुलभा जंजाळ, अनिता काकरवाल ,राम जाधव, श्रीकांत पातोडे इत्यादी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow