चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावणारा सराईत आरोपी दोन तासात जेरबंद...

 0
चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावणारा सराईत आरोपी दोन तासात जेरबंद...

,,चाकूचा धाक दाखवून दोन अल्पवयीन मुलांकडून मोबाईल हिसकावणारा सराईत आरोपी अवघ्या २ तासांत जेरबंद

छत्रपती संभाजीनगर, दि. 23(औरंगाबाद)-

जवाहरनगर हद्दीत चाकूचा धाक दाखवून दोन अल्पवयीन मुलांच्या खिशातील रेडमी कंपनीचे दोन मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून पसार झालेल्या सराईत आरोपीस पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली आहे.

सदर आरोपी हा लुटमारीच्या गुन्ह्यातून 15 दिवसांपूर्वीच हर्सूल कारागृहातून सुटलेला असून, सुटताच त्याने पुन्हा गुन्हेगारी कृत्य केल्याचे उघड झाले आहे. आरोपीकडून चोरीचा एक एच.एफ. डिलक्स मोटरसायकल व चार महागडे मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

16 वर्षीय मुलगा व त्याचा मित्र हे पाटील हॉस्पिटल ते पाटील हॉटेल या मार्गावरून पायी जात असताना, एका इसमाने अचानक गळ्यात हात टाकून चाकूचा धाक दाखवला व खिशातील मोबाईल फोन हिसकावून पळ काढला. या प्रकरणी पोलीस ठाणे जवाहरनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता, जवाहरनगर बिटचे पोलीस अमलदार मारोती गोरे यांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता, सदर आरोपी शिवाजीनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि. रमेश जाधव, पोहे/अनिल भाले, बिट मार्शल पोश/मारोती गोरे यांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.

तपासादरम्यान आरोपीने मोटरसायकल चोरी तसेच अल्पवयीन मुलांकडून मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली. आरोपीचे नाव जय सतीश साळवे (वय 19), रा. बौद्धनगर नं.01, छत्रपती संभाजीनगर असे आहे. त्याच्यावर यापूर्वीही लुटमारीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, पोलीस ठाणे जवाहरनगर येथे विविध कलमान्वये गुन्हे नोंद आहेत.

या कारवाईत पोलीस आयुक्त श्री. प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ-02 श्री. प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. मनीष कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow