बँकेची 25 लाख रोख लुटणारी टोळी काही तासांत जेरबंद, चार आरोपी अटक...
बँकेची 25 लाखांची रोकड लुटणारी टोळी काही तासांत जेरबंद...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) पैठण तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा दावरवाडीची 25 लाखांची रोकड पैठण-पाचोड रोडने गोणीमध्ये स्कुटीवरुन फिर्यादी नामे गणेश आनंदा पहिलवान, वय 59, व्यवसाय सेवानिवृत्त कर्मचारी, राहणार प्लाॅट नंबर 4178 नवीन कावसान अन्नपूर्णा नगर जवळ, पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे 16 नोव्हेंबर रोजी जात असताना एक काळ्या रंगाची मोटारसायकल व त्यावर दोन अज्ञात इसम तोंड बांधलेले आवाज देवून थांबवले. फिर्यादीस धाक दाखवून रोख 25 लाख रुपयांची गोणी हिसकावून पसार झाले. पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काही तासांत चार आरोपी व मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
भारत राजेंद्र रुपेकर, वय 30, राहणार नानेगाव, तालुका पैठण, विष्णू कल्याण बोधने, वय 24, राहणार नानेगाव, सचिन विठ्ठल सोलाट, वय 25, राहणार राहुल नगर, उत्तर जायकवाडी, पैठण, विशाल दामोदर चांदणे, वय 24, राहणार आखातखेडा, तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्याकडून शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून स्विफ्ट कार क्रं.MH-20, FU-3479 हिच्यामध्ये जबरीने चोरी केलेले बँकेचे 25 लाख रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार किंमत 6 लाख रुपये, 8 मोबाईल फोन किंमत 56 हजार रुपये असा एकूण 31,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपिंनी गुन्हा कबूल केला आहे. न्यायालयाने 19 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदरील कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राठोड, सपोनि संतोष मिसाळे, सपोनि पवन इंगळे, पोह विठ्ठल डोके, विष्णू गायकवाड, शिवानंद बनगे, अनिल चव्हाण, अशोक वाघ, राहुल गायकवाड, अनिल काळे, सनि खरात, योगेश तरमळे, जिवन घोलप यांनी केली आहे. पुढील तपास पाचोड पोस्टे सपोनि सचिन पंडीत करत
आहे.
What's Your Reaction?