शहरात महापालिकेच्या वतीने 44 ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुविधा केंद्र

 0
शहरात महापालिकेच्या वतीने 44 ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुविधा केंद्र

महानगरपालिकेतर्फे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबविणे करता ४४ ठिकाणी सुविधा केंद्र...

छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.27(डि-24 न्यूज ) महानगरपालिकेच्या वतीने शासन निर्देशानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्याकरता सर्व १० प्रशासकीय कार्यालय अंतर्गत एकूण ४४ ठिकाणी मा.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

  शासन निर्णय क्रमांक मबावि २०२४/प्र.क्र.९६/ कार्या-२ दिनांक ०३ जुलै २०२४ मधील मार्गदर्शक सुचनांनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविणे करीता वय वर्ष २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांकडुन अर्ज मागविणे करीता स्थापन केलेल्या सुविधा केंद्र येथे निशुल्क अर्ज सादर करावा.

आवश्यक असणारे कागदपत्रे खालील प्रमाणे:-

१) आधार कार्ड (अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे). २) अधिवास प्रमाणपत्र, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५वर्षापुर्वीचे रेशन कार्ड /१५ वर्षापुर्वीचे

मतदार ओळखपत्र/ जन्म प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक. ३) महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षापुर्वीचे रेशन कार्ड /१५ वर्षापुर्वीचे मतदार ओळखपत्र/ जन्म प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला/ अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.

४) वार्षिक उत्पन्न रू.२.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक. अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही,

ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रू.२.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक,

५) अर्जदाराचे हमीपत्र

६) बैंक खाते तपशील (खाते आधार लिंक असावे)

७) अर्जदाराचा फोटो (लाभार्थी महिलेचा)

छत्रपती संभाजीनगर तर्फे झोन कार्यालय अंतर्गत सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. अर्ज

स्विकारण्याकरीता खालील प्रमाणे सुविधा केंद्र:- .

वॉर्ड कार्यालय :-०१

मनपा शाळा भावसिंगपुरा

मनपा शाळा आरेफ कॉलनी

पडेगांव मनपा शाळा

झोन क्रं.०१ मनपा मुख्य कार्यालय.

वार्ड कार्यालय:-०२

संजयनगर आरोग्य केंद्र मोंढा

गरमपाणी आरोग्य केंद्र मनपा

गांधीनगर हॉस्पीटल मनपा

जिन्सी आरोग्य केंद्र मनपा

काबरा गार्डन नागेश्वरवाडी

महानगरपालिका झोन कार्यालय क्रं.२ (जी)

वार्ड कार्यालय -०३

महानगरपालिका झोन कार्यालय -०३

कैसर कॉलनी वाचनालय (रोशनगेट)

खाजा गरीब नवाज (नेहरूनगर आरोग्य केंद्र)

वार्ड कार्यालय -०४

महानगरपालिका झोन कार्यालय क्रं. ४

एन ११ आरोग्य केंद्र मनपा.

नागरी सुविधा केंद्र टि.व्ही सेंटर

वार्ड कार्यालय -०५

नारेगाव मनपा शाळा ब्रिजवाडी

महानगरपालिका झोन कार्यालय क्रं.५

चौधरी कॉलनी मसनतपुर

एन ५ कम्युनिटी सेंटर

एन ६ मनपा ओम प्राथमिक शाळा

महादेव मंदिन एन ७ एन ८ व आंबेडकर नगर प्रभाग

वार्ड कार्यालय -०६

एम आर एफ सेंटर सुशिलादेवी शाळेच्या बाजुला विठ्ठलनगर

एन २ कम्युनिटी सेंटर कामगार चौक ठाकरेनगर

मनपा केंद्रीय प्रा.शाळा १३ वी योजना जयभवानीनगर

मनपा हजेरी सेंटर आंबेडकर चौक चिकलठाणा

मनपा हजेरी सेंटर हनुमान मंदिरच्या बाजुला, मुंकुदवाडी गाव

वार्ड कार्यालय -०७

महानगरपालिका झोन कार्यालय ७ फ

हनुमान नगर पाण्याची टाकी जवळ

मनपा गारखेडा शाळा

प्रियदर्शनी इंदिरानगर शाळा

वार्ड कार्यालय -०८

जुन ग्रामपंचायत कार्यालय सातारा वार्ड क्रं. ११५

मालमत्ता कर वसुली केंद्र, दत्त मंदिराजवळ बिड बाय पास देवळाई चौक

नागरी सुविधा केंद्र झोन क्रं.८ जे.जे टॉवर बजाज हॉस्पीटल समोर बिड बायपास

वार्ड कार्यालय -०९

उस्मानपुरा मनपा शाळा

मनपा झोन क्रमांक ९ जुने कार्यालय.

महानगरपालिका झोन कार्यालय -०९

सिल्कमिल कॉलनी मनपा शाळा

एकनाथनगर मनपा शाळा

वार्ड कार्यालय -१०

नक्षत्रवाडी मनपा शाळा

कांचनवाडी मनपा शाळा

ईटखेडा मनपा शाळा

राहुलनगर बनेवाडी मनपा शाळा

झोन क्रं.१० रेल्वेस्टेशन कार्यालय

वरील प्रमाणे स्थापन केलेल्या सुविधा केंद्र येथे सर्व महिला लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घ्यावा असे महानगरपालिकेच्या महिला व बाल विकास विभाग यांचे वतीने आवाहन करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow