तीन दिवसांत पकडला जाईल बिबट्या - पालकमंत्री अब्दुल सत्तार
नागरीकांनी घाबरू नका तीन दिवसांत पकडला जाईल बिबट्या पालकमंत्री अब्दुल सत्तार...
चिकलठाणा औद्योगिक परिसरात सुरक्षा रक्षकाला काल बिबट्या दिसल्याने पळताना सुरक्षारक्षक अमोल अभंग जखमी झाले आहेत.... त्यामुळे वन विभाग व अन्य विभाग अलर्ट मोडवर येऊन बिबट्याची शोधमोहीम गतीने सुरू झाली आहे....
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.28(डि-24 न्यूज) मागिल काही दिवसांपासून शहरात बिबट्या आढळल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अल्पसंख्याक व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना बिबट्या कधी पकडला जाईल हा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी आहे त्याला पकडून जंगलात सोडण्याची जवाबदारी वन विभागाची आहे. वन विभाग व इतर विभाग त्याला पकडण्यासाठी पथक तयार केले आहे. तीन दिवसांत बिबट्याला पकडून जंगलात सोडण्याचे नियोजन करावे असे आदेश संबंधित विभागाला दिले आहे. बिबट्यामुळे कोणालाही इजा होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
What's Your Reaction?