काँग्रेसची लोकसभा निवडणुकीची तयारी, 10 ऑक्टोबर रोजी पटोलेंच्या उपस्थितीत मराठवाड्याची बैठक
 
                                काँग्रेसची लोकसभा निवडणुकीची तयारी, 10 ऑक्टोबर रोजी पटोलेंच्या उपस्थितीत मराठवाड्याची बैठक
औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणुकीची काँग्रेसच्या वतीने तयारी सुरू केली आहे. मराठवाड्याची आढावा बैठक मंगळवारी शहरात होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राज्याचे दिग्गज नेते या बैठकीत उपस्थित राहुन आढावा घेणार आहे.
अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रदेश सरचिटणीस तथा समन्वयक अनिल पटेल यांनी दिली आहे.
या बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री आरेफ नसिमखान, बसवराज पाटील व प्रदेश काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहे.
या बैठकीत मराठवाडा, औरंगाबाद जिल्हा, शहराचा आढावा घेतला जाणार आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे, शहराध्यक्ष युसुफ शेख, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अॅड सय्यद अक्रम, कांचन कुमार चाटे, डॉ.अरुण सिरसाट, उमाकांत खोतकर, डॉ.पवन डोंगरे, सय्यद फयाजोद्दीन, शेख कैसरबाबा, विनायक सरवदे, असमत खान उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            