मोठी बातमी, औरंगाबाद नामांतर विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल...!

 0
मोठी बातमी, औरंगाबाद नामांतर विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल...!

औरंगाबाद नामांतर विरोधात सर्वोच्च न्यायालयात हिशाम उस्मानी यांची याचिका दाखल...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) औरंगाबाद नामांतर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात 8 मे 2024 रोजी याचिका फेटाळण्यात आले होते. आता या निर्णयाविरोधात मुख्य याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका 16 जुलै 2024 रोजी अॅड शकील अहमद सय्यद अॅण्ड असोसिएटस यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यांचे सोबत संजय वाघमारे हे ही यात याचिकाकर्ते आहे.

मुंबई उच्च न्यायालयात नामांतर विरोधात मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी दाखल केली होती त्यावेळी सर्व याचिका फेटाळण्यात आले. सरकारने औरंगाबाद विभाग, औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद तालुका, औरंगाबाद शहर, औरंगाबाद गावाचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला होता त्याविरोधात उस्मानी यांनी काँग्रेस नामांतराच्या निर्णयात आघाडी शासनाच्या वेळी काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन सुरुवातीपासून न्यायालयीन लढा देत आहे. 

अॅड.एस.एस.काझी, अॅड सय्यद सऊद अहेमद हे त्यांच्या याचिकेवर काम पाहत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow