शहरात मोहर्रम उत्साहात साजरा, शिया बांधवांच्या वतीने मातमी जुलूस...!

 0
शहरात मोहर्रम उत्साहात साजरा, शिया बांधवांच्या वतीने मातमी जुलूस...!

शहरात मोहर्रम उत्साहात, यौमे आशुरा निमित्ताने सवारीया, शिया बांधवांचा मातमी जुलूस...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.17(डि-24 न्यूज) आज शहरात मोहर्रम निमित्ताने यौमे आशुरा निमित्ताने शहरातील सर्व सवारीया सिटीचौकात दरवर्षीप्रमाणे यौमे आशुरा निमित्ताने जमा झाले. शिया बांधवांच्या वतीने मातमी जुलूस काढण्यात आले. एकतेचे प्रतिक असलेल्या मोहर्रम निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शहरात प्रमुख रस्त्यांवर इमाम हुसेन हसन यांच्या आठवणीत शरबत व भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती. दहा दिवसांपासून बसलेल्या सवा-या आज एका ठिकाणी येऊन विसर्जन केले जाते. केला जातो. शहरात बडे चाँद साब, हिरे की सवारी, छोटे चाँद साब, पंजे की सवारी या महत्त्वाच्या मानल्या जातात. 

पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी यावेळी शुभेच्छा देताना सांगितले शहर आमचे घर आहे. आम्ही त्यात बंधुभाव व शांतता राखू. त्यासाठी नागरीकांचे सहकार्याची गरज आहे. समाजातील मुलांना उच्च शिक्षण देऊन अधिकारी बनवा. शिक्षणाशिवाय पर्याय नाही चांगले दर्जेदार शिक्षण घ्या शिक्षणाने माणूस पुढे जातो असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.

गेल्या 52 वर्षांपासून अलमबरदार समितीचे माजी महापौर रशीद खान मामू हे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितले शहरात मोहर्रम शेकडो वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जगात कोठेही शिया सुन्नी मोहर्रम निमित्ताने एकत्र येत नाही येथे एकत्र येतात अशी परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असल्याने एकतेचा प्रतिक हा सण आहे. 139 सवा-या एकत्र येतात. शिया बांधवांच्या वतीने मातमी जुलूस काढण्यात येते. सुन्नी बांधव मातमी जुलूससाठी वाट मोकळी करून देतात. ढोल ताशांच्या गजरात सकाळी सिटी चौक येथे सर्व सवा-या दाखल झाले. काळे कपडे परिधान करून मातमी जुलूस फाजलपूरा येथील मोहंमद नवाब आशूरखाना येथून दिवानदेवडी आशुरखाना सालारजंग पर्यंत काढण्यात आला. दहा दिवस विविध कार्यक्रम शिया बांधवांच्या वतीने केले जातात, इमाम हुसेन यांच्या आठवणीत मातम करुन दु:ख व्यक्त करतात असे एजाज झैदी यांनी सांगितले. सवा-यांचे स्वागत पोलिस आयुक्तालय व आलम बरदार कमिटीच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अलम बरदार कमेटीचे अध्यक्ष माजी महापौर रशीद मामू, अफसरखान, पोलिस आयुक्त प्रविण पवार, महापालिकेचे आयुक्त जी.श्रीकांत, पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, पोलिस उपायुक्त नवनीत काॅवत, पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर, सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, शिया समाजाचे एजाज झैदी, मौलाना हैदर रझा, हुसेन रझवी, रजा रझवी, सय्यद अली रझा, हुसेन रझवी बिजनौर, अब्बास रझवी, एड जिशान झैदी, अहेतेशाम आबेदी, मुशीर हुसेन आदी उपस्थित होते

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow