इम्तियाज जलिल यांच्यावर वंचितचे अफसरखान यांचे गंभीर आरोप...

इम्तियाज जलिल यांच्या विरोधात वंचितचे अफसरखान मैदानात...
इम्तियाज जलिल यांचे उत्पन्न एक लाख प्रती महीना मग कोट्यावधींचा मन्नत कसा बांधला, पत्रकार परिषदेत केले गंभीर आरोप...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), एमआयएमचे इम्तियाज जलिल हे पाच आमदार व पाच वर्ष खासदार असताना शहर व जिल्ह्याचा विकास त्यांनी केला नाही. कोणावरही आरोप करुन ते ब्लॅकमेल करतात भीती घालतात सेटलमेंट झाल्यानंतर पिछा सोडतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे. राजकारणात मागिल दहा वर्षांपासून त्यांचे असेच सुरु आहे. अधिकार नसताना आमदार होते तेव्हा गुटख्याच्या साठ्यावर त्यांनी छापा मारला नंतर तेच गुटखा माफियासोबत भागिदार बनले. जालना रोड येथील वक्फ मालमत्तेवर प्रश्न उपस्थित केले. धन्नासेठच्या कब्ज्यातून हि मालमत्ता वक्फला मिळवून गरीबांचे भले करणार म्हणाले बोलणी झाल्यानंतर आजारपणाचे ढोंग करुन एका खाजगी रुग्णालयात भरती झाले. त्यानंतर गप्प का बसले याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्यांचे एक लाखाचे दर महीन्याला उत्पन्न असताना कोट्यावधींचा मन्नत बंगला खरेदी करुन कसा बांधला...? सिडकोच्या जागेवर त्यांचे दोन घर आहेत. सिडकोवर दबाव आणून दोन कोटींची मालमत्ता 95 लाखात खरेदी केली आणि त्या बंगल्यावर सजावटीत कोट्यावधी रुपये खर्च केले. एवढे पैसे आले कोठून यांचे उत्तर त्यांनी द्यावे. बंगल्याला चार हजार रुपये मालमत्ता कर लावला. दहा लाख रुपये मालमत्ता कर थकीत आहे. कोट्यावधींची मालमत्ता दौलताबाद येथे पत्नीच्या नावावर घेतली. वक्फ बोर्डाची लिज तीन वर्षांपूर्वी संपली मग त्या जागेवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे त्यांचे कार्यालय सुरु आहे. समाजाची एवढी त्यांना चिंता आहे तर गरीबांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी दुकाने काढावी. वक्फ बोर्डाने त्या जागेचे टेंडर काढून गरजूंना लिजवर द्यावे अशी मागणी वक्फ मंत्र्यांना करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मालमत्तेची चौकशी लावावी
असे सनसनाटी आरोप एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर वंचितांचे अफसरखान यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
पालकमंत्री संजय सिरसाठ यांच्यावर मालमत्ते संबंधी इम्तियाज जलिल यांनी गंभीर आरोप केले आहे यामुळे शहर व जिल्ह्याचे राजकारण तापले असताना इम्तियाज जलिल यांच्या विरोधात हल्लाबोल करुन वंचितचे अफसरखान मैदानात उतरले आहे. दहा वर्षांच्या कार्यकाळात इम्तियाज जलिल यांनी आणलेल्या निधीची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. अफसरखान यांचे बंधू स्व.सलिम मौला यांच्याकडे मालमत्ता कर थकीत असल्याच्या नोटीसा मनपावर दबाव आणून काढायला लावले. माझे निवासस्थान मकब-याच्या शासकीय जागेवर बांधले असल्याचा खोटे आरोप करुन जागा रिकामी करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला. प्रशासनाने चौकशी केल्यानंतर आरोप निराधार असल्याचे समोर आले. पत्रकार परिषदेत अफसरखान यांनी खरेदी केलेली मालमत्तेची कागदपत्रे दाखवली. आणखी अनेक मालमत्ता खरेदी केल्याची प्रकरणे काढणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे. सर्व प्रकरणाची विविध एजंसीकडून व प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
What's Your Reaction?






