राज्यसभेसाठी अशोक चव्हाण भाजपाचे उमेदवार, राणेंचा पत्ता कट...? श्रीमती मेधा कुलकर्णी, डॉ.अजित गोपछडे नवीन चेहरा
राज्यसभेसाठी अशोक चव्हाण भाजपाचे उमेदवार, राणेंचा पत्ता कट...? श्रीमती मेधा कुलकर्णी, डॉ . अजित गोपछडे नवीन चेहरा
मुंबई, दि.14(डि-24 न्यूज)
कालच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपाने राज्यसभेची उमेदवारी देऊन व्हालेन्टाईन डे चा गिफ्ट दिले आहे. काँग्रेसच्या आमदार व सदस्यपदाचा राजीनामा देऊन मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपाचे सदस्यत्व त्यांनी स्विकारले. त्यांचे सोबत काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.
महाराष्ट्रातून तीन उमेदवारांची घोषणा भाजपाने आज केली त्यामध्ये अशोक चव्हाण व नवीन चेहरा श्रीमती मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. नारायण राणे यांचा पत्ता कट झाल्याचे यावरून दिसत आहे.
गुजरात राज्यातून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, गोविंदभाई ढोलकीया, मयंकभाई नायक, डॉ.जसवंतसिंह सलामसिंह परमार यांच्या नावाची घोषणा भाजपाने केली आहे. राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या सहीने या उमेदवारांच्या नावांची घोषणा भाजपाने केली आहे.
What's Your Reaction?