मुकुंदवाडीत लाठीचार्ज, अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडल्या, सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह 7 ते 8 पोलिस जखमी
मुकुंदवाडीत लाठीचार्ज, अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडल्या, सहायक पोलिस आयुक्त सहीत 7 ते 8 पोलिस जखमी
अतिक्रमण हटावो पथकावर दगडफेक.....
औरंगाबाद, दि.21(डि-24 न्यूज) मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात महापालिका व पोलीस प्रशासनाने येथील नागरिकांची तक्रार असल्याने अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना येथे पोलिसांना लाठीचार्ज व अश्रु धुरांच्या नळकांड्या फोडल्या.
येथे अवैध धंदे वाढले व अतिक्रमण वाढल्याने सकाळी हि कारवाई सुरू करण्यात आली असताना हि घटना घडली. या घटनेत सहायक पोलिस आयुक्त रनजित पाटील व सात ते आठ पोलिस कर्मचारी व मनपाचे काही कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. एका वर्तमानपत्राच्या छायाचित्रकाराच्या कॅमेराची सुध्दा नुकसान झाले आहे. मनपा प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने कळवण्यात आले की सध्या झेंडा चौकात अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे. कार्यवाही सुरू असताना मोठा जमाव जमला होता. अतिक्रमण हटवताना विरोध करण्यात आला यावेळी वाद निर्माण झाला व हि घटना घडली. यावेळी पथकावर दगडफेक करण्यात आली यामध्ये दंगापथक काबू महीला कर्मचारीच्या डोक्याला विट लागल्याने गंभीर जखमी झाले. जखमींत पोलिस कर्मचारी संदीप जाधव, दादाराव म्हस्के, राधा शिंगणे व अन्य जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे
.
What's Your Reaction?