वक्फ मंडळाचे भरती परीक्षा पुढे ढकलल्या, नवीन तारखेसाठी प्रतिक्षा करावी लागणार...!

 0
वक्फ मंडळाचे भरती परीक्षा पुढे ढकलल्या, नवीन तारखेसाठी प्रतिक्षा करावी लागणार...!

वक्फ मंडळाची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आले, नवीन तारखीची प्रतिक्षा करावी 

औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील विविध जागांसाठी पदभरतीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे असे पत्र आज मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मो.बा.ताशिलदार यांनी काढले आहे उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील पदभरतीसाठी दिनांक 4/8/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिराती अनुसरून विविध पदांच्या परीक्षा 4/11/2023 व 5/11/2023 रोजी आयोजित करण्यात आले होते.

राज्यात सुरु असलेले विविध आंदोलनांमुळे काही भागांमध्ये संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. काही जिल्ह्यांत वाहतूक व्यवस्था बंद आहे तसेच इंटरनेट सुविधा देखील प्रभावित आहे. परीक्षार्थींना उद्भवणा-या संभावित अडचणी विचारात घेता आयोजित सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. परिक्षेच्या सुधारीत तारखा https:mdd.maharashtra.gov.in.https//mahawakf.com व https://mahawakf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर रोजगार/भरती या मथळ्याखाली प्रसिद्ध करण्यात येतील. असे पत्रात म्हटले आहे.

मागिल अनेक वर्षांपासून रखडलेली कर्मचारी भरती प्रक्रिया आता सुरू झाली आहे. एकूण 60 पदभरतीसाठी 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2023 पर्यंत वक्फ मंडळाने उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये जिल्हा वक्फ अधिकारी/अधिक्षक 25 पदे, कनिष्ठ लिपिक 31, लघूटंकलेखक 1, कनिष्ठ अभियंता 1, विधी सहायक 2 असे एकूण 60 पदभरतीसाठी 4 व 5 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा होणार होती ती परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांना नवीन तारखेसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow