कायदा सुव्यवस्था राखत शांततेत गणेशोत्सव विसर्जन करा - अनिकेत निल्लावार

पदविधर मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपाने कंबर कसली, संजय केनेकर यांच्यावर मोठी जवाबदारी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) -
तीन पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जवळ येत असल्याने भाजपाने आतापासून या निवडणुका लढण्यासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आमदार संजय केनेकर यांच्या खांद्यावर मोठी जवाबदारी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभागाच्या पदवीधर मतदारांची नोंदणी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. नागपूर पदविधर मतदार संघाच्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी सुधाकर विठ्ठलराव कोहळे तर पुणे मतदार नोंदणी प्रमुख म्हणून राजेश बाबुलाल पांडे यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टीने केली आहे.
What's Your Reaction?






