छत्रपती संभाजीनगर की औरंगाबाद ...? उच्च न्यायालयात सुनावणी संपली, निर्णयाची प्रतीक्षा...!
नामांतराचा निर्णय बेकायदेशीर - सिनिअर कौन्सिल अनिल अंतूरकर
औरंगाबाद शहर नामांतरावरावर सुनावणी झाली, सरकारी पक्षाचे वकिलांची बाजू ऐकून घेणार निर्णय, उस्मानाबादची सुनावणी 23 फेब्रुवारीला...
मुंबई, दि.21(डि-24 न्यूज)
ऐतिहासिक औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय बेकायदेशीर घेण्यात आला. केंद्र शासनाच्या गाईडलाईनचे पालन करण्यात आले नाही. न्यायालयाने कायदेशीर बाबी बघून आमच्या बाजूने न्याय द्यावा. मुंबई उच्च न्यायालयासमोर आपली बाजू भक्कमपणे मांडताना सिनिअर कौन्सिल अनिल अंतूरकर यांनी असे सांगितले अशी माहिती डि-24 न्यूजला याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी दिली आहे.
अंतूरकर यांनी औरंगाबाद खंडपीठाचे रजिस्ट्रार यांनी नवीन नावाचा वापर करावा असे सर्क्युलर काढले होते तेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
औरंगाबाद शहराच्या नामांतरावरावर आज न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय व न्यायमूर्ती डॉक्टर आरीफ यांच्यासमोर सुनावणी झाली. 23 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद शहराचे नामांतरावरावर सुनावणी होणार आहे यानंतर सरकारी पक्षाचे वकिलांची बाजू ऐकून निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे.
विविध नामांतर विरोधी याचिकाकर्ते यांनी यावेळी सांगितले अंतुरकर यांनी जी बाजू मांडली तीच आमची बाजू आहे असे न्यायालयात स्पष्ट केले.
यावेळी याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांचे वकील एस. एस. काजी, एड मोईन शेख आदी उपस्थि
त होते.
What's Your Reaction?