भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकजूट होऊन लोकसभा निवडणूक लढणार - एड प्रकाश आंबेडकर

 0
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकजूट होऊन लोकसभा निवडणूक लढणार - एड प्रकाश आंबेडकर

महाविकास आघाडीत जागावाटपाचा फार्मुला ठरला, भाजपाला हरवण्यासाठी सोबत लढणार - एड प्रकाश आंबेडकर

भाजपला दोनशे जागा मिळतील, जरांगे पाटील यांनी जालन्यातून अपक्ष लोकसभा निवडणुकीत उभे राहावे, सगेसोय-याची व्याख्या काय सरकारने स्पष्ट करावे, जरांगे आणि ओबीसींचे आंदोलन सुरू होण्याची शक्यता.... जोपर्यंत ओबीसी सोबत आहे तोपर्यंत एमआयएमशी युतीबाबत बोलनी नाही....

माजी खासदार उत्तमसिंह पवार हे वंचितच्या तिकीटावर लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा...

औरंगाबाद, दि.21(डि-24 न्यूज) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचितने महाविकास आघाडीला मसूदा दिला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपसात 48 जागावाटप करावे गरज पडल्यास वंचितही या बैठकीत उपस्थित राहणार. वंचित निमंत्रक म्हणून काम बघत आहे. काँग्रेस, शिवसेना उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी जागावाटप केले तर त्या घटकपक्षासोबत आम्हाला जी जागा हवी आहे बोलणी करुन घेऊ. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकजूट होऊन लोकसभा निवडणूक लढणार आहे. 

भाजपाचा भीती दाखवून पक्ष फोडण्याचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. दादागिरी केली जात आहे. इतर लोकांना पक्षात घेणे म्हणजे भाजपा फिअर सायकोसिसमध्ये गेली आहे असे मी मानतो. यावरून असे दिसते की भाजपा लोकांना घाबरलेली आहे. मोदींचा नैरेटीव आहे चारशे पार मला नाही वाटत या फिगर पर्यंत लोकसभेत भाजपला यश मिळेल. देशात दोनशे जागा अशा आहेत त्या राज्यात ती जागा भाजपा लढत नाहीत. उरले 354 यामधून त्यांना दोनशे जागा मिळतील. मोदी बोलतात की मला देवाने आदेश दिले होते राम मंदिर बांधण्याचे. हा अवतार पहील्यांदाच पंतप्रधानांचा बघितला यावरुन साधू संत चिडलेले आहेत म्हणून याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत होईल व मोदींना दोनशेचाच आकडा आकडा गाठता येईल असे मी मानतो. असे मोठे विधान वंचितचे सुप्रीमो एड प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

पुढे बोलताना त्यांनी जरांगे पाटील यांचे पुन्हा सुरू होणाऱ्या उपोषणावर भाष्य केले. त्यांनी जरांगेंना मोलाचा सल्ला दिला की त्यांनी जालना येथून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवावी. आपल्या शक्तीचा वापर करावा यामध्ये यश मिळाले तर विधानसभा आणि त्यानंतर पक्ष स्थापन करावे. सगेसोयरे यांची व्याख्या काय सरकारने स्पष्ट करावे. किंवा जरांगेंनी हि व्याख्या सरकारला दिली का हा पण प्रश्नच आहे. सरकारने जरांगेंच्या मागणीवर विचार करावा व मराठा आरक्षणावर कायदेशीर बाबींवर आगामी काळात येणारे आव्हान व संभ्रम दूर करावे. मागास आयोगातून एका सदस्याने राजीनामा दिला होता त्याबद्दल न्यायालयात काय होईल हे पण सध्या सांगता येणार नाही. जरांगेंचे उपोषण सुरू झाले तर ओबीसींचेही होईल असे संकेत त्यांनी दिले आहे. ओवेसींची अकोल्यात झालेल्या सभेबद्दल त्यांनी सांगितले त्यांना अधिकार आहे सभा घेण्याचा. एमआयएम सोबत न जाण्याचा निर्णय वंचितने घेतला तो कायम राहणार आहे. अकोला लोकसभा निवडणुकीत उमेदवार असलो तर मतदार निर्णय घेतील काय करायचे. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत आमच्याकडे इच्छुक उमेदवार आहे पण तो गुलदस्त्यात आहे असे आंबेडकर यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow