विश्रांतीनगर येथील रस्ता बाधित 125 अतिक्रमणे जमीनदोस्त, उद्याही कारवाई

 0
विश्रांतीनगर येथील रस्ता बाधित 125 अतिक्रमणे जमीनदोस्त, उद्याही कारवाई

विश्रांती नगर येथील रस्ता बाधित 125 अतिक्रमणे जमीनदोस्त...

दगडफेकीत मनपा व पोलीस कर्मचारी जखमी...

औरंगाबाद, दि.21(डि-24 न्यूज) शहरातील विश्रांती चौक ,मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन व झेंडा चौक येथील रस्ता बाधित 125 अतिक्रमणे आज जमीनदोस्त करण्यात आली.

 24 मीटर डीपी रोड वरील सदरील ठिकाणी पत्र्याचे शेड, कच्ची पक्की आरसीसीचे बांधकामे नागरिकांनी केली होती. या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी या अतिक्रमण धारकांना सूचित करण्यात आले होते. परंतु अतिक्रमण धारकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले नाही व या डिपी रोडवर अतिक्रमण केले.

या अनुषंगाने या रस्ता बाधित 140 मालमत्ता धारकांना नोटीस वाटप करण्यात आल्या आहेत. त्या पैकी अंदाजे 120 ते 125 रस्ता बाधित मालमत्ताचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आले.

आज सकाळी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उप आयुक्त मंगेश देवरे व सहायक पोलिस आयुक्त रणजीत पाटील यांनी या ठिकाणी आंदोलकांशी चर्चा केली. सबंधित मालमत्ता धारकांना शासकीय योजनांत लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आयुक्त महोदयांनी स्पीकर फोन द्वारे आंदोलकांशी संवाद साधला. त्यांनी प्रशासनाची भूमिका समजावून सांगितली. प्रशासानाला आपल्या भावना समजतात, बाधित मालमत्ता धारकांना शासकीय योजनांत लाभ मिळवून देण्याची हमी त्यांनी यावेळी दिली. करिता लेखी द्यायला तयार आहे असे ते म्हणाले. परंतु आंदोलक तत्काळ लेखी द्या यावर ठाम होते. व ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

यामुळे आयुक्त महोदयांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले.

या नंतर सुध्दा एक शेवटचा प्रयत्न म्हणून पोलीस प्रशासन व मनपा प्रशासनाच्या वतीने आंदोलकांशी चर्चा सुरू केली या दरम्यान अचानक दगडफेक सुरू झाली यात मनपा अतिक्रमण निरीक्षक रामेश्वर सुरासे, नागरी मित्र पथकाचे कर्मचारी, काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

यानंतर जेसीबीच्या साहाय्याने पत्र्याचे शेड, आरसीसीचे बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. उर्वरित कारवाई उद्या परत सकाळी 8 वाजे पासून सुरू करण्यात येणार आहे.

 सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उप आयुक्त मंगेश देवरे, सहायक पोलिस आयुक्त रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, यादव ,गीता बागवडे, तावले, सहायक आयुक्त अर्जुन गिराम, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, रविंद्र देसाई, रामेश्वर सूरासे, नागरी मित्र पथकाचे कर्मचारी, जेसीबी पथक कर्मचारी यांनी पार पाडली अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात

आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow