पोलिस कारवाई करत आहे समाजाने शांतता राखावी मुस्लिम धर्मगुरु व इम्तियाज जलील यांचे आवाहन...!
पोलिस कारवाई करत आहे समाजाने शांतता राखावी, मुस्लिम धर्मगुरु व इम्तियाज जलील यांचे आवाहन...
राज्याचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न हाणून पाडा, इम्तियाज जलील यांचे आवाहन...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.16(डि-24 न्यूज) इस्लाम धर्म व मोहंमद पैगंबर यांच्या बद्दल कथित वक्तव्य करणाऱ्या रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज, राहणार सरला बेट, मौजे पंचाळी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करावे. त्यांनी असले वक्तव्य करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्ष राज्याचे वातावरण खराब करण्याचा षडयंत्र करत आहे. शुक्रवारी नाशिक व नंदुरबार येथे सकल हिंदू मोर्चांना परवानगी दिली आम्ही आंदोलन मोर्चासाठी परवानगी मागत आहे तर मिळत नाही. असला दुजा भाव का...? बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या विरोधात मोर्चाला परवानगी दिली जाते मग आमच्या प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या विरोधात मुस्लिम समाजाला रस्त्यावर उतरवण्यासाठी असले षडयंत्र केले जात आहे. रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्या या वक्तव्यामुळे देशात व राज्यात रोष आहे. दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची मुस्लिम धर्मगुरु यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी भेट घेतली व सखोल चर्चा केली. मुस्लिम समाजाला त्यांनी विश्वास दिला आहे की या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाईल. शहरातील शांतता आपल्याला खराब करायची नाही. कायदेशीर कारवाई त्या व्यक्तीवर करायला पोलिस विभागाला भाग पाडायचे आहे. कायदा हातात घ्यायचा नाही. असे आवाहन मुस्लिम धर्मगुरु व एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी यावेळी केले.
जोपर्यंत त्या महाराजाला अटक होणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा शिष्टमंडळाने निवेदन देताना केला आहे. दुपारी इम्तियाज जलील यांनी सरकारवर टीका करत पत्रकार परिषद घेऊन समाजातील युवकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील शहर तालुका व गावात निवेदन व लेखी तक्रार केली जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी डॉ.मौलाना अब्दुल रशीद मदनी, मौलाना मोईजोद्दीन कासमी, मौलाना अब्दुल कवी फलाही, मोहम्मद हुसेन रजवी, हाफीज असरालूल हक, मौलाना अब्दुल अलीम, हाफिज आरीफ नुरी, नासेर सिद्दीकी, आदील मदनी आदींची उपस्थिती होती
.
What's Your Reaction?