कायदा व सुव्यवस्था राखत गणेशोत्सव विसर्जन करा- पोलिस आयुक्त मनोज लोहिया

कायदा, सुव्यवस्था राखत गणेशोत्सव विसर्जन शांततेत करा - पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांचे आवाहन
पोलिस आयुक्तांच्या हस्ते श्री गणेश महासंघाच्या "श्री" ची आरती
औरंगाबाद,दि. 26(डि-24 न्यूज) गणरायाला साकडे घालताना पोलीस आयुक्त मनोज लोहिया म्हणाले की, एकात्मता आणि एकमेकांबद्दल समर्पण भावना निर्माण करणारा हा गणेशोत्सव आपली संस्कृती, जोपासणारा असून प्रत्येक गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन कायदा, सुव्यवस्था राखत उत्साहात करावे असे आवाहन यावेळी बोलतांना केले.
निराला बाजार, येथील मोतीवाला कॉम्प्लेक्स च्या केएफसी बिल्डींग मध्ये असलेल्या श्री गणेश महासंघाच्या “श्री” ची आरती मंगळवारी पोलीस आयुक्त आयुक्त मनोज लोहिया यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार, उत्सव समिती अध्यक्ष राजेंद्र जंजाळ, विधीज्ञ अभयसिंह भोसले, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, तनुसुख झांबड, अभिषेक देशमुख, किशोर तुलसीबागवाले, सदिंप शेळके, विशाल दाभाडे, अनिकेत पवार, विजय चौधरी, विनोद साबळे, सोनु खरात, हरीश शिंदे, विशाल काकडे, प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे, सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी पोलिस प्रशासनाने आभार व्यक्त करत श्री गणेश विसर्जन शांततेत आणि कायदा सुव्यवस्था राखत सर्व मंडळाकडून केले जाईल अशी ग्वाही देत सर्व पोलीस प्रशासनाने श्री गणेश भक्तांना सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
What's Your Reaction?






