स्मार्ट सिटीत केंद्रीय सुरक्षा बलच्या सुरक्षा जवानांना रस्ता पार करण्यासाठी...!

 0
स्मार्ट सिटीत केंद्रीय सुरक्षा बलच्या सुरक्षा जवानांना रस्ता पार करण्यासाठी...!

स्मार्ट सिटीत केंद्रीय सुरक्षा बलच्या सुरक्षा जवानांना रस्ता पार करण्यासाठी...!

औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) गणपती उत्सवाच्या सुरक्षेच्या निमित्ताने केंद्रीय सुरक्षा बलाच्या तुकड्या शहरात बंदोबस्तासाठी पोलिसांसोबत तैनात करण्यात आले आहे.

आज सुरक्षा बलचे जवान व शहर पोलिसांनी हर्सूल व शहागंज भागात रुट मार्च केले. स्मार्ट सिटीत हर्सूल परिसरात पावसाचे पाणी जागोजागी रस्त्यावर तुंबल्याने जवान व पोलिसांना रस्ता पार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. जागोजागी रस्त्यावर डबके तुडुंब भरलेले आहे. अचानक जोराचा पाऊस सुरू झाल्याने तारांबळ उडाली. पोलिस अधिकारी व केंद्रीय सुरक्षा बलाचे अधिकारी यांनाही रस्ता पार करण्यासाठी त्रास सहन करावा लागला. पाऊस सुरू असला तरी स्मार्ट सिटीत बनत असलेल्या रस्त्यावर पाणी वाहून गेले पाहिजे असे नियोजन मनपा प्रशासनाने करायला हवे. वाहनधारकांना सुध्दा रस्त्यावर साचलेल्या पाण्यात वाहन चालवणे कठीण होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow