बावनकुळेंसाठी पत्रकारांकडून विशेष पार्टीचे निमंत्रण, वाजतगाजत भाजपा कार्यालयात दिले निमंत्रण
बावनकुळेंसाठी पत्रकारांकडून विशेष पार्टीचे आयोजन
वाजत-गाजत भाजपा कार्यालयावर जाऊन दिली निमंत्रण पत्रिका
-चहा पाजा, धाब्यावर न्या-वक्तव्याचा अनोख्या पद्धतीने समाचार
औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या अशी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्याचा शहरातील पत्रकारांच्या वतीने अनोख्या पद्धतीने समाचार घेण्यात आला. बावनकुळे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टिमसाठी शहरात विशेष पार्टीचे आयोजन करण्यात आले असून, या खास पार्टी मंगळवारी (दि.26) वाजत-गाजत भाजपा कार्यालयावर निमंत्रण देण्यात आले.
भाजपाचे शहराध्यक्ष शिरिष बोराळकर यांनी निमंत्रण स्वीकारले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांना धाब्यावर न्या, त्यांना खुश करा.चहा-पाणीसह अन्य व्यवस्था करा. असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. संबध पत्रकाराचे स्वाभीमान दुखावणाऱ्या या वक्तव्याचा राज्यभरातून तीव्र संताव व्यक्त होत आहे. औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनेही मंगळवारी बावनकुळे यांच्या वक्तव्याचा आगळावेगळा समाचार घेण्यात आला. संघटनेच्या वतीने बावनकुळे आणि त्यांच्या टिमसाठी शहरातील पत्रकार भवनात विशेष पार्टीचे नियोजन करण्यातआले आहे. या पार्टीत चहा बरोबर अन्य व्यवस्थाही करण्यात आली आहे. या पार्टीला प्रमुखअतिथी म्हणून बावनकुळे यांना निमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या पार्टीसाठी वेळ द्यावा आणि आमचे निमंत्रण स्विकारावे ही मागणी आणि निमंत्रण पत्रिका घेऊन अनेक पत्रकार मंगळवारी दुपारी बारा वाजता वाजत-गाजत उस्मानपुरा येथील भाजपा कार्यालयात गेले. येथे भाजपाचे शहराध्यक्ष शिरिष बोराळकर यांना हे निमंत्रण पत्रिका देत बावनकुळे यांचा पार्टीसाठी वेळ घेऊन देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद काकडे, सचिव देव शेजुळ, उपाध्यक्ष गणेश खेडकर, सहसचिव प्रमोद अडसुळे, सहकोषाध्यक्ष तुषार वखरे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी, सुधीर देशपांडे, निवृत्ती गवळी, चंद्रशेखर कुलकर्णी, रुपेश कलंत्री, महेश कुलकर्णी, दिलीप पाईकराव, जे.ई. देशकर, शफीउल्लाह हुसैनी, सुनील कच्छवे, अमीत मोरे, सिद्धार्थ गोदाम, कृष्णा केंडे, देविदास त्र्यंबके, माधव इतबारे, चंद्रशेखर कुरणे, सतीश रेंगे, आदीत्य वाघमारे, योगेश लोंडे, मच्छींद्र नागरे, सावेश जाधव, चंदू थोटे, किशोर निकम, राम वायभट, शेख रहीम, शकील खान, फारुख खान, शेख राजु, सचिन बडे, राहुल जांगडे, सचिन माने, अमेय पाठक, श्याम पलाये, सचिन जिरे, विजय देऊळगावकर,अशोक कांबळे यांच्यासह अनेक पत्रकार
What's Your Reaction?