उद्या दौलताबाद रस्ता अवजड व मध्यम वाहनांसाठी बंद, पर्यायी मार्गाचा वापर करावा
उद्या दौलताबाद कडे जाणा-या अवजड व मध्यम वाहनांना बंदी, पर्यायी रस्त्याचा उपयोग करावा
औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) उद्या 28 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद हा एकाच दिवशी हिंदू-मुस्लिम बांधवांचा सण आहे. ईद-ए-मिलादच्या निमित्ताने जरजरी बख्श दर्गाह खुलताबाद येथे 28 सप्टेंबर रोजी सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत उर्स आहे. त्यासाठी शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने वाहनाने खुलताबादला जातात. त्यामुळे दौलताबाद घाट परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच, गणपती विसर्जनाच्या दिवशीच दौलताबाद गाव, माळीवाडा, अब्दीमंडी येथून निघणारी गणपती विसर्जन मिरवणूक दुपारी 4 ते रात्री 12 या वेळेत मुख्य रस्त्यावरून विसर्जन स्थळापर्यंत जाईल. त्यामुळे वाहनांमुळे नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका, अडथळा किंवा गैरसोय होऊ नये, यासाठी वाहनांची व भाविकांची प्रचंड गर्दी टाळण्यासाठी या रस्त्यांवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त यांनी वाहतूकीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत हा मार्ग दौलताबाद टी पॉइंट ते खुलताबादकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या मध्यम व अवजड वाहनांसाठी आणि माळीवाडा गावातून दौलताबादकडे जाण्यासाठी बंद आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार सदर मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा. पर्यायी पद्धत-
औरंगाबाद येथून खुलताबाद मार्गे कन्नडकडे जाणारी सर्व प्रकारची मध्यम व अवजड वाहने दौलताबाद टी पॉइंट, माळीवाडा, जांभळा, कासाबखेडा फाटा, वेरूळ मार्गे जातील.
धुळे-कन्नडकडून औरंगाबादकडे खुलताबाद मार्गे येणारी मध्यम व अवजड वाहने वेरूळ, कसाबखेडा फाटा, जांभळा, माळीवाडा, दौलताबाद टी पॉइंट, नगरनाका, बाबा पेट्रोल पंप मार्गे येतील. माळीवाडा येथून खुलताबाद मार्गे दौलताबादकडे जाणारी सर्व प्रकारची मध्यम व अवजड वाहने माळीवाडा, जांभळा, कसाबखेडा फाटा, वेरूळ मार्गे जातील व येतील.
पोलीस, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा वाहनांना ही अधिसूचना लागू होणार नाही. अधिसूचनेचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती एमपी अॅक्टच्या कलम 131 आणि इतर फौजदारी कायद्यांतर्गत शिक्षेस पात्र असेल. अशी माहिती डि-24 न्यूजला मिळाली आहे.
What's Your Reaction?