एजाज देशमुख सेंट्रल हज कमेटीवर...!
एजाज देशमुख सेंट्रल हज कमिटी वर....!
औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) केंद्र शासनाच्या सेंट्रल हज कमिटी सदस्य पदी निवडी करिता आज मंत्रालयात घेण्यात आलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सेंट्रल हज कमिटीवर तीन वर्षासाठी सदस्यांची निवड केली जाते. त्यात हज यात्रेसाठी भारतातील सर्वात जास्त जाणाऱ्या हज यात्रेसाठी जाणाऱ्या 3 राज्यातील एक एक सदस्य निवडला जातो. या कॅटेगिरी मध्ये महाराष्ट्र राज्य हज कमिटी मधून सेंट्रल हज कमिटीवर एका सदस्याची निवड करण्यासाठी आज मुंबई येथे मंत्रालयात निवडणूक आयोजित करण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे सदस्य आणि भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य हज कमिटी मध्ये एकूण 11 सदस्य आहेत. 10 जानेवारी रोजी सेंट्रल हज कमिटी सदस्य निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. या निवडणुकीत मतदान करण्याचे अधिकार महाराष्ट्र राज्य हज कमिटी सदस्यांसह अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री आणि महाराष्ट्र राज्य वक्त मंडळाचे अध्यक्ष यांना पण निवडणूक लढविण्याचे आणि मतदानाचे अधिकार आहेत. निवडणूक कार्यक्रमाची प्रक्रिया आज रोजी सुरू झाल्यानंतर हाजी एजाज देशमुख यांचे शिवाय इतर कोणीही नामांकन पत्र दाखल केले नाही. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची निवड झाल्याचे जाहीर केली आहे. त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.
हाजी एजाज देशमुख हे बीड शहरातील रहिवाशी असून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय नेते व प्रवक्ते आहेत. भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड होण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकाळ पूर्ण केले. औरंगाबाद शहरातून जाणाऱ्या हज यात्रेकरूंच्या सेवेत ते नेहमी तत्पर असतात. त्यांच्या निवडीने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
What's Your Reaction?