खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने होणार...!
खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने होणार
औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज) शहरात पतसंस्था, क्रेडिट सोसायटीत घोटाळ्याची मालिकाच सुरू झाली आहे. हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये या बँकेच्या खात्यात अडकले आहेत. अनियमितता आढळून आल्याने आरबीआय व डिडिआर विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जात आहे. परंतु खातेदारांचे पैसे कधी परत मिळतील यास विलंब लागत असल्याने गुंतवणूकदार हैराण झाले आहेत यामुळे घोटाळे उघडकीस आलेल्या पतसंस्थेतील गुंतवणूकदार खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली 30 जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत प्रांतोष वाघमारे यांनी दिली आहे.
आदर्श नागरी पतसंस्था, अजिंठा को.ऑप.बँक, मलकापूर अर्बन, ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटी, आशा इन्हवेस्टमेंट एण्ड डेव्हलोपर्स, यशस्विनी, कृष्णाई, नवरंग, आधार, राधाई पतसंस्थेतील ठेवीदार पैसे परत मिळावे यासाठी आंदोलन करणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
याप्रसंगी गुंतवणूकदार सुरेशराव फुसे, संजय काथार, रमेश राजपूत, बाबूराव चौधरी, राकेश कपूर, मोनाली जड, भाऊलाल विठोरे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?