भाजपा व एमआयएमची जोरदार मुसंडी, महापौर भाजपाचा होणार...,
भाजपा व एमआयएमची जोरदार मुसंडी, महापौर भाजपाचा बनणार...!
भाजपा व एमआयएमने या महापालिका निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. ओवेसी बंधुंना 33 नगरसेवक बनवून गिफ्ट दिले आहे तर भाजपाचे 58 नगरसेवक निवडून आल्याने आता मोठा भाऊ बणण्यासाठी मतदारांनी कौल दिला आहे. स्वबळावर आता महापौर भाजपाचा बनणार अशी परिस्थिती निकालानंतर स्पष्ट झाली आहे. भाजपा 58 जागेवर विजय मिळवत पहिल्या नंबरवर दुसऱ्या क्रमांकावर 33 जागेवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकावर तर शिवसेना 13 जागांवर विजय मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहे. वंचितने काँग्रेसच्या मुकाबल्यात चांगले प्रदर्शन करत चार जागा पटकाविल्या. शिंदे सेनेचे 12 नगरसेवक निवडून आल्याने भाजपाला आता शिवसेनेची गरज भासणार नाही. अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. वंचितला चार जागा, ठाकरे गट सहा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी एक, काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले.
आमच्या प्रतिनिधीने भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्याशी प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले विकासासाठी मतदारांनी हा कौल दिला आहे. भाजपाच शहराचा सर्वांगीण विकास करु शकते असा विश्वास शहरातील जनतेने मतदानातून दाखवून दिले आहे. महापौर पाच वर्षे आमचाच राहणार असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अधिक निधी आणत विकासकामे केली जातील जे आश्वासन दिले ते पूर्ण करणार आहे. असे त्यांनी सांगितले.
शहरातील मतदारांचे आभार मानत एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी यांनी सांगितले बॅ.असदोद्दीन ओवेसी व अकबरोद्दीन ओवेसी यांनी प्रचार दौरे करून जनतेला एमआयएमला निवडून देण्याचे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत ऐतिहासिक विजय मिळवला. आमचे नगरसेवक सदैव जनतेच्या प्रश्नांना सभागृहात मांडून सोडवण्याचा प्रयत्न करतील. दिलेले आश्वासन पूर्ण करणार. असल्याचे सांगितले.
सहयोगी पक्षाला भाजपा संपवण्याचा प्रयत्न करत आहे. शहराला पाणी मिळाले नाही तरीही धन शक्तीचा वापर करून भाजपाने सत्ता मिळवली. आम्ही मतदारांपर्यंत गेलो. प्रचार केला. सहा जागेवर विजय मिळाला तर 36 जागेवर दुस-या क्रमांकावर राहिलो. जनतेच्या प्रश्नावर शिवसेना (उबाठा) आवाज बुलंद करत राहणार असल्याचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी निकालानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आणि नगरसेवकांची नावांची सविस्तर यादी वाचा...
संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक : २९ प्रभागांतून ११५ निवडून आलेल्या नगरसेवकांची यादी...
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) दि. १६ जानेवारी: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक मंगळवार, दिनांक १५ जानेवारी रोजी शांततेत पार पडली. एकूण २९ प्रभागांमध्ये झालेल्या या निवडणुकीत ११५ नगरसेवक निवडून देण्यात येणार होते. आज दिनांक १६ जानेवारी रोजी मतमोजणी पूर्ण झाली असून निकाल जाहीर झाले. या निकालांमध्ये भाजप (BJP), शिवसेना (SS), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे [SS-UBT], ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM), काँग्रेस (INC), वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट [NCP-SP] या पक्षांनी आपली ताकद दाखवली आहे.
प्रभाग क्रमांक १
अशोक रंगनाथ हिवराळे (AIMIM), विजयश्री जाधव (AIMIM), जिनत युनूस पटेल (AIMIM), पठाण अझहर अय्युब (AIMIM)
प्रभाग क्रमांक २
पुष्पा उत्तमराव रोजतकर (BJP), नागरे किशोर बाबुराव (SS), सुवर्णलता उल्हास पाटील साळवे (BJP), राजगौरव हरिदास वानखेडे (BJP)
प्रभाग क्रमांक ३
अमित सुधाकर भुईगळ (VBA), जरीना जावेद कुरेशी (VBA), करुणा मेघानंद जाधव (VBA), अफसर खान यासीन खान (VBA)
प्रभाग क्रमांक ४
दाभाडे प्रेमा मिलिंद (SS), राशिद खान मामू हमीद खान (SS-UBT), वाणी सावित्रीबाई हिरालाल (SS-UBT), गणेश कौतिकराव लोखंडे (SS-UBT)
प्रभाग क्रमांक ५
रुही मोहसिन खान (AIMIM), अब्दुल समीर अब्दुल साजिद (AIMIM), फरजाना साबेर हुसेन (AIMIM), अली मीर वाजिद (AIMIM)
प्रभाग क्रमांक ६
मोहम्मद वसीम अलीम (AIMIM), शेख नर्गिस सलीम (AIMIM), शेख वजिया बेगम (AIMIM), मेराज खान जलील खान (AIMIM)
प्रभाग क्रमांक ७
हिवराळे जीवकपाळ भिमराव (BJP), सुनिता मधुकर सोनवणे (SS-UBT), ज्योती मुकेश जैन (BJP), माळवतकर महेश शिवाजीराव (BJP)
प्रभाग क्रमांक ८
भारती महेंद्र सोनवणे (BJP), रामदास पंडित हरने (BJP), गायकवाड मोहिनी लक्ष्मण (BJP), औताडे विजय साईनाथ (BJP)
प्रभाग क्रमांक ९
काकासाहेब दामोदर काकडे (AIMIM), शाहिन रहिम पटेल (AIMIM), खान सादिया अमजत खान (AIMIM), मतीन मजीद शेख (AIMIM)
प्रभाग क्रमांक १०
सुरेखा बाळासाहेब सानप (BJP), अर्चना संजय चौधरी (BJP), गणेश रामजीवन नवंदर (BJP), दांडगे शिवाजी भाऊसाहेब (BJP)
प्रभाग क्रमांक ११
स्वामी विश्वनाथ गुरुलिंग (BJP), अॅड. अदवंत माधुरी मिलिंद देशमुख (BJP), खरात मीना नितीन (BJP), मयूर बन्सिलाल वंजारी (BJP)
प्रभाग क्रमांक १२
शेख फरहत जहान (AIMIM), सुम्मैया खान निसार खान (AIMIM), मोहम्मद वाजिद जागिरदार (AIMIM), शेर खान हाजी अब्दुल रहमान खान (AIMIM)
प्रभाग क्रमांक १३
सय्यद सोहेल (AIMIM), अलकसेरी दिना मोहम्मद (AIMIM), जोहरा समीरबिन हैदरा (AIMIM), सय्यद उसामा अब्दुल कादिर (AIMIM)
प्रभाग क्रमांक १४
कुरेशी मालेका बेगम हबीब कुरैशी (INC), फेरोज खान (AIMIM), खान अलमास खानम अमजद (AIMIM), मुन्शी शेख (AIMIM)
प्रभाग क्रमांक १५
खैरे सचिन सूर्यकांत (SS-UBT), तरन्नुम अकील अहमद (AIMIM), नूर जहाँ इकबाल (AIMIM), ऋषिकेश प्रदीप जैस्वाल (SS)
प्रभाग क्रमांक १६
संगिता नितीन सांगळे (BJP), वाडेकर राजू जगन्नाथ (BJP), भालेराव आशा नरेश (BJP), बहाडवे रामेश्वर बाबुराव (BJP)
प्रभाग क्रमांक १७
साळवे सिमा सिद्धार्थ (BJP), अनिल श्रीकृष्ण माकरीये (BJP), किर्ती महेंद्र शिंदे (BJP), समीर सुभाष राजूरकर (BJP)
प्रभाग क्रमांक १८
हर्षदा संजय शिरसाट (SS), अभिजीत देविदास जीवनवाल (SS), छाया विजय वाघचौरे (SS), राजू मगनसिंग राजपूत (SS)
प्रभाग क्रमांक १९
चंद्रकांत सुखदेव हिवराळे (BJP), शिल्पाराणी सागर वाडकर (BJP), बुरांडे शोभा गुरुलिंगप्पा (BJP), सतिंदर सिंग ओबेरॉय (NCP-SP)
प्रभाग क्रमांक २०
शेंडगे जालिंदर महादेव (BJP), अर्चना शैलेंद्र नीलकंठ (BJP), अनिता किशोर मानकापे (BJP), त्रिंबक गणपतराव तुपे (SS)
प्रभाग क्रमांक २१
गवळी नंदलाल सुरेश (BJP), थोरात कमल दिलीप (BJP), सुमित्रा शंकरराव माथरे (BJP), सुरेंद्र माणिकराव कुलकर्णी (BJP)
प्रभाग क्रमांक २२
निरपगारे पुष्पा कांतिलाल (BJP), अशोक धोंडिबा दामले (BJP), यशोदा रमेश्वर शेळके (SS), जंजाळ राजेंद्र हिम्मतराव (SS)
प्रभाग क्रमांक २३
गायकरवाड सुरेखा ताराचंद (BJP), बालासाहेब दिनकर मुंढे (BJP), सत्यभामा दामउण्णा शिंदे (BJP), प्रमोद प्रल्हाद राठोड (BJP)
प्रभाग क्रमांक २४
गंगाबाई भीमराव भरे (BJP), नारोडे कमल रामचंद्र (BJP), दुबे मुक्ता किशन (BJP), जगताप सुनील देविदास (BJP)
प्रभाग क्रमांक २५
मनोज बन्सी मामा गांगवे(BJP), कोरडे वैशाली रामेश्वर(उबाठा), प्रियंका दिपक खोतकर (BJP), रवी साहेबराव कावडे(BJP)
प्रभाग क्रमांक 26
साळवे अनिता मोहनलाल (BJP), राजपूत पद्मसिंग काशिनाथ (BJP), कुलकर्णी सविता रत्नाकर(BJP), हिवाळे अप्पासाहेब विनायकराव (BJP)
प्रभाग क्रमांक २७
गायकवाड दया कैलास (BJP), केंद्रा गोविंद परशुराम (BJP), साळुंके सुनीता संजय(BJP), रेणुकादास(राजु) दत्तोपंत वैद्य (BJP)
प्रभाग क्रमांक २८
वाहुळ सुनीता मनोज (AIMIM), खान अब्दुल मतीन (AIMIM), नसीम बेगम मोहम्मद अफसर (AIMIM), शेख साबेर पाशू (AIMIM)
प्रभाग क्रमांक २९
सिध्दांत संजय शिरसाट (SS), अनिता नंदकुमार घोडेले (SS), स्वेता सुमीत त्रिवेदी (SS)
या निकालांमुळे महानगरपालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट झाले असून भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष, तर AIMIM ने जुन्या शहरात वर्चस्व, शिवसेना व SS-UBT यांनी मध्यम ताकद, तर इतर पक्षांनी मर्यादित पण निर्णायक जागा मिळवल्या आहेत. आता महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती, विविध समितीचे सभापतीपद भाजपाच्या नगरसेवकांकडे असणार आहे. निवडीकडे शहराचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?