नवीन ओबेरॉय यांनी राखली राष्ट्रवादीची लाज, काँग्रेसला मिळाला फक्त एकच नगरसेवक...पराभवाला कोण जवाबदारी...
नवीन ओबेरॉय यांनी राखली राष्ट्रवादीची लाज, काँग्रेसला मिळाला फक्त एकच नगरसेवक, मुस्लिम बहुल प्रभागात एमआयएमच्या लाटेत दोन्ही पक्षांना फटका, वोट बँक गेला कोठे प्रश्न उपस्थित...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) - महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. मुस्लिम बहुल प्रभागात एमआयएमच्या लाटेत दोन्ही पक्षांना फटका बसला आहे. वोट बँक कोठे गेला, नेते कोठे कमी पडले..?, या पराभवाची जबाबदारी कोण स्विकारणार हा प्रश्न दबक्या आवाजात कार्यकर्ते विचारत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी सोबत आघाडी करुन 70 उमेदवार रिंगणात उतरवले होते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे 25 उमेदवार रिंगणात होते. दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष या निवडणुकीत प्रचारापासून दूर राहिले. राष्ट्रवादीचे ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला व त्यांची पत्नी प्रभाग क्रमांक 28 मधून उमेदवार होते दोघांचाही दारुण पराभव झाला. तर काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख यांचे चिरंजीव सलिम शेख प्रभाग क्रमांक 3 मधून रिंगणात असल्याने त्यांनी पक्षाच्या उमेदवारांना प्रचारासाठी वेळ दिला नाही अशी चर्चा शहरात सुरू आहे. त्यांच्या चिरंजीवचा दारुण पराभव झाला ते तिसऱ्या नंबरवर फेकले गेले. काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 14 मधून श्रीमती मलेका हबीब कुरैशी यांच्या स्वतःच्या ताकदीवर निवडून आल्या. 29 प्रभागात 115 मधून एकमेव काँग्रेसचा नगरसेवक त्यांच्या रुपाने मिळाला. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे सतिंदरसिंग उर्फ नवीन मनमोहनसिंग ओबेरॉय हे स्वतःच्या ताकदीवर प्रभाग क्रमांक 19 मधून निवडून आले. त्यांनी 6725 मतांनी भाजपाचे संजय रामदास जोशी यांचा पराभव केला आहे. हि परिस्थिती या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसची झाली आहे. दोन्ही शहराध्यक्ष या पराभवाची परतफेड कशी करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष बदलावे अशी चर्चा पक्षा अंतर्गत आता सुरू झाली आहे.
What's Your Reaction?