हर्सुलमध्ये एमआयएमला कौल, भाजपा, शिवसेनेला धक्का...

 0
हर्सुलमध्ये एमआयएमला कौल, भाजपा, शिवसेनेला धक्का...

हर्सुलमध्ये एमआयएम, भाजपा शिवसेनेला धक्का...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपा, शिंदे सेना, उबाठाला मत विभाजनाचा फटका बसला आहे. या प्रभागात चारही नगरसेवक एमआयएमचे निवडून आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी नवख्या चेह-यांना संधी दिली होती त्यांला मतदारांनी स्विकारत सर्वांना विजयी केले आहे. या प्रभागात विजयश्री जाधव, झिनत युनुस पटेल, विजय हिवराळे, अजहर पठाण हे एमआयएमचे चारही नगरसेवक निवडून आले आहे. विजयाचा हिरवा गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी एकता नगर, हर्सुल, सईदा काॅलनी येथे जल्लोष साजरा केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow