नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मद्यधुंद वाहन चालकांवर पोलिसांची नजर, होणार कडक कारवाई
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला मद्यधुंद वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), 31 डिसेंबर रोजी नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यधुंद वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश झालेल्या बैठकीत पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी दिले आहेत. त्यांनी आढावा बैठकीत हे आदेश दिले आहेत. 31 डिसेंबर निमित्ताने वाहतूक शाखेला शहरात विविध ठिकाणी नाकेबंदी करून मद्य किंवा अमली पदार्थांचे सेवन करुन चालविणारे वाहन चालकांमुळे त्यांच्या स्वतःच्या जिवीताला व त्यांच्यामुळे इतर वाहनचालक व नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये. तसेच पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात भविष्यात कोणत्याही प्रकारे मद्य किंवा अमली पदार्थ सेवन करुन त्यांच्या ताब्यातील वाहन चालवून हिट अँड रन सारखा गंभीर अपघात होऊ नये व वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी मद्य सेवन करुन वाहन चालकांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागास देण्यात आले आहे.
दिनांक 27 डिसेंबर ते 28 डिसेंबर पावेतो मद्य सेवन करुन वाहन चालकांवर कार्यवाही करण्यासाठी वाहतूक विभागाचे पाचही शाखा तर्फे संबंधित पोलिस स्टेशन व गुन्हे शाखा अशी संयुक्तिक विशेष मोहीम राबविण्यात आली. शहरातील विविध चौकात वाहतूक शाखा, संबंधित पोलिस स्टेशन व गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार नेमुन 618 वाहन चालकांचे ब्रेथ अनालायझर यंत्राद्वारे तपासणी करून मद्य सेवन केलेल्या 69 वाहन चालकांवर कार्यवाही करुन त्यांची वाहने ताब्यात घेण्यात आली आहे. सदर कारवाईचा आढावा पोलिस आयुक्त प्रविण पवार वेळोवेळी घेत आहेत. यापुढेही अशीच विशेष मोहीम राबवून शहरातील ठिकठिकाणी मद्य सेवन करुन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. बॅनर, फ्लेक्स लावून मद्य सेवन करुन वाहन चालवू नये, वाहतूकीचे नियमांचे पालन करावे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, राजेश मयेकर, अमोल देवकर, विवेक जाधव व पोलीस कर्मचारी यांनी केली आ
हे.
What's Your Reaction?