गुंठेवारी रद्द करण्याच्या मागणीसाठी सातारा-देवळाईकर रस्त्यावर, काढली दुचाकी रॅली
गुंठेवारी रद्द करण्याच्या मागणीसाठी सातारा-देवळाईकर रस्त्यावर, काढली दुचाकी रॅली
औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) सातारा-देवळाई परिसरात कारण नसताना महापालिकेच्या वतीने गुंठेवारी कायद्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न होत आहे. गुंठेवारी रद्द करण्याच्या मागणीसाठी उड्डाणपूल येथे दुचाकी रॅली काढून नागरीकांनी मनपा प्रशासनाला केली आहे.
ग्रामपंचायत परवानगी असलेल्या सातारा-देवळाई मधील घरांना गुंठेवारी कायद्यातून मुक्त करण्याची मागणी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे गुंठेवारी कायदा तयारच मुळात अशासाठी झालेला आहे जे अवैध बांधकाम आहे अधिकृत करण्यासाठी गुंठेवारी कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. या कायद्याच्या मुख्य उद्देशामध्येच सातारा-देवळाई परिसरात मधील नागरीकांचा समावेश होत नाही. येथील नागरीकांच्या घरांचे जुने लेआऊट मंजूर आहेत. बांधकाम परवानग्या त्यावेळच्या ग्रामपंचायतने 25-30 वर्षांपूर्वी दिले आहे. नियमानुसार त्यांनी शासनातर्फे अधिकार असलेल्या ग्रामपंचायतींच्या परवानग्या घेतलेल्या आहेत. असे असताना त्यांना अवैध मानने अतिशय चुकीचे आहे. यामुळे येथे गुंठेवारी कायदा लागू करण्याची आवश्यकता नाही. ग्रामपंचायत व महापालिकेच्या कायद्यानुसार जर कुठे उल्लंघन झाले असेल तर तेवढ्या पर्यंत दंडात्मक कारवाई महापालिकेने करावी. गुंठेवारी कायदा लागू होत नसल्याने विनाकारण येथील नागरिकांना त्रास देऊ नये. नागरीकांना भयमुक्त आणि गुंठेवारी कायदा मुक्त ठेवावे अशी विनंती केली आहे. राज्य शासन व महापालिकेने निर्णय घेऊन न्याय मिळवून दिला नाही तर न्यायालयाचे दरवाजे ठोठाऊ असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महानगरप्रमुख रेणूकादास(राजु) वैद्य यांची सही आहे.
What's Your Reaction?