शंभर रुग्णांनी हरवले कॅन्सरला, एशियन हाॅस्पीटलने केले सन्मानित...!
मराठवाड्यात सर्वप्रथम सरवाईवर्स "अजिंक्य योद्धा" प्रोग्राम
एशियन हॉस्पिटल तर्फे ८ जून २०२४ रोजी, हॉटेल अतिथी येथे कॅन्सर सर्वाईवर्स व सपोर्ट प्रोग्राम "अजिंक्य योद्धा" असा कार्यक्रम, मराठवाडय़ात सर्वप्रथमच राबवण्यात आला.
औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज ) एशियन हॉस्पिटल चे डॉ नितिन ताठे यांनी टाटा हॉस्पिटल येथुन आल्यानंतर केलेल्या हजारो शस्त्रक्रियां पैकी ज्या लोकांनी कॅन्सर ह्या आजारावर वर पूर्णपणे मात दिली आहे आणि 5 ते 9 वर्षांचा फाॅलो अप पुर्ण केला आहे, अशा अंदाजे 100 अजिंक्य योद्ध्यांना बोलवून त्यांचे सत्कार करण्यात आले आणि ह्या अजिंक्य योद्ध्यांनी ह्या भयानक आजाराला कसा यशस्वी लढा दिला हे मनोगत खूप चांगल्या आणि सरळ भाषेत व्यक्त केले. यावेळी आपले मत व्यक्त करताना डॉ.शोएब हाश्मी यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे आभार मानले. कॅन्सर हा आजार वाढत असल्याची त्यांनी चिंता व्यक्त केली. दररोज एशियन हाॅस्पीटलमध्ये कॅन्सरच्या तीन चे चार रुग्णांची शस्त्रक्रिया केली जात आहे. मुंबईचे टाटा हॉस्पिटल दूर असल्याने रुग्ण आमच्याकडे येतात. येथे त्या रुग्णाला योग्य मार्गदर्शन केले जाते. महाराष्ट्र कॅन्सर मुक्त करण्यासाठी व रुग्णांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. शहरात अत्याधुनिक कॅन्सर हाॅस्पिटल सुरू करण्याचा मानस यावेळी त्यांनी बोलून दाखवला.
तसेच ह्या कार्यक्रमाला शहराचे नमांकित डॉक्टर्स उपस्थित होते. डॉ शोएब हाश्मी चीफ मॅनेजिंग डायरेक्टर एशियन हॉस्पिल, डॉ. उज्वला दहिफळे IMA प्रेसिडेंट, डॉ. अक्रम खान वरिष्ठ अस्थिरोग तज्ञ, डाॅ. नितिन ताठे कॅन्सर सर्जन, डॉ. अस्फिया खान, डॉ. परिक्षीत ठाकूर, डाॅ. प्रशांत वळसे, डाॅ. प्रियांका पानसंबळ होते.
डॉ. शोएब हाश्मी ह्यांनी शहरामध्ये एक कॅन्सर समर्पित रुग्णालय असावे असा विचार ही मांडला. डॉ. नितिन ताठे यांनी असे कॅन्सर बद्दल जनजागृती आणि कॅन्सरला कशा पद्धतीने लढा आणि मात द्यावी यासाठी दरवर्षी कार्यक्रम करण्याचे आश्वासन ही दिले, आणि कार्यक्रमासाठी आलेल्या कॅन्सर सर्वाईवर्स ला कॅन्सर जनजागृती करण्याचे आवाहन ही केले. त्यांच्या मागणीनुसार एशियन हॉस्पिटल येथे दर 3 महिन्यांत कॅन्सर सपोर्ट प्रोग्राम घेण्याचे जाहिर केले
.
What's Your Reaction?