अमित शहा यांच्या विरोधात एसडिपिआय रस्त्यावर, केली राजीनाम्याची मागणी

 0
अमित शहा यांच्या विरोधात एसडिपिआय रस्त्यावर, केली राजीनाम्याची मागणी

अमित शहा यांच्या विरोधात SDPI चे तीव्र निषेध प्रदर्शन, राजीनाम्याची मागणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 28(डि-24 न्यूज) 

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा समोर बाबासाहेबांचे प्रतिमेचे अभिवादन करण्यात आले तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक विधानाचा तीव्र निषेध करून, 'सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया'( एसडीपीआई) तर्फे अमित शहा यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून निर्दशन करण्यात आले.

घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे फॅशन नाही तर एक पॅशन आहे असे अशोक जाधव यांनी सांगितले.

अमित शहा यांनी तात्काळ देशाच्या नागरिकांसमोर माफी मागावी व आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

संविधान निर्माते डॉ. आंबेडकर यांच्या विरोधात अवमानकारक बोलणाऱ्या व्यक्तीला गृहमंत्री पदावर राहण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही, अशी मागणी जिल्हा अध्यक्ष साकी अहमद यांनी प्रसार माध्यमा समोर सांगितले.

सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया मागणी करते की अमित शहा यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. या आंदोलनात राज्य उपाध्यक्ष अशोक जाधव, जिल्हाध्यक्ष साकी अहमद, जिल्हा महासचिव नदीम शेख, जिल्हा कोषाध्यक्ष अबुझर पटेल, माजी जिल्हाध्यक्ष मोहसीन खान, ऍड.विजय वानखेडे (पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया जिल्हा सदस्य), राहुल सूनवणे, समीर शाह, रियाज सौदागर, व पार्टीचे कार्येकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow