मनपा राबविणार गुणवत्ता वाढीसाठी पंचसूत्री कार्यक्रम...!
मनपा राबविणार गुणवत्ता वाढीसाठी पंचसूत्री कार्यक्रम.....
प्रियदर्शनी व मुकुंदवाडी केंद्रात एक जानेवारीपासून जर्मन भाषा शिकवण्यास सुरुवात.....
मनपाच्या प्रियदर्शनी शाळेत गुणवत्ता वाढीसाठी पंचसूत्री कार्यक्रमाची शिक्षक परिषद
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज)
आयुक्त जी श्रीकांत साहेब यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या पंचसूत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आज महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी येथे प्रियदर्शनी व मुकुंदवाडी केंद्राच्या मुख्याध्यापक, शिक्षक ,, सीबीएसई माध्यमांचे शिक्षक, तासिका शिक्षक व बालवाडी शिक्षिका यांची शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजीव सोनार, प्रमुख पाहुणे के बी चौधरी, मुख्याध्यापक मुकुंदवाडी तसेच सावित्री कंट्रोल रूमच्या भीमा हिवराळे व तबस्सुम शेख .....उपस्थित होत्या. दोन्ही केंद्राच्या अंतर्गत शाळेचे सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सिबीएसई शाळेचे सर्व शिक्षक, तासिका शिक्षक व बालवाडी शिक्षिका यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय मुख्याध्यापक संजीव सोनार सर यांनी केले. गुणवत्ता वाढीसाठी पंचसूत्री कार्यक्रम कसा राबवावा याचे सादरीकरण शशिकांत उबाळे यांनी केले. सर्व शिक्षकांनी मनपा शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करू तसेच इंग्रजीबरोबर जर्मन व फ्रेंच भाषा स्वतः शिकू व विद्यार्थ्यांनाही या भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहित करण्याबद्दल हमी भरली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती तेजस्विनी देसले यांनी तर आभार प्रदर्शन चौधरी सर यांनी केले.
ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबू राठोड, मनीषा नगरकर, रश्मी होंनमुटे, पूजा सोनवणे, प्रकाश इंगळे यांनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?