काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांना श्रद्धांजली

काँग्रेसतर्फे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) भारताचे माजी पंतप्रधान तथा अर्थशास्त्री यांचे दुःखद निधन झाल्यामुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा मनपाचे माजी सभापती ॲड एकबालसिंग गिल यांनी भडकल गेट येथे डॉ.मनमोहन सिंग यांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यामध्ये काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी अर्थतज्ञ व आपला हिरा अर्थशास्त्रीचा सरदार हरपला जागतिक कीर्तीचे महान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारत देशाला आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले. विशेष त्यांचे महाराष्ट्र जातीने लक्ष होते खास करून मराठवाड्यातील भाग नांदेड येथे त्यांनी गुरुद्वारेसाठी विकासासाठी भरभरून निधी दिला अशा आठवणींना उजाळा देण्यात आला म्हणून भावना व्यक्त केल्या .
यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश मुगदिया, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. जफर अहमद खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष तथा माजी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इब्राहिम पठाण, माजी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड सय्यद अक्रम अशा जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोईन इनामदार, अनिस पटेल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष इरफान खान गुलाब खान, रवी लोखंडे, प्रमोद सदाशिव, साबिया बाजी शेख, उत्तम दनके, प्रा. देवानंद वानखडे, सुभोध सावळे, आनंद दाबाडे, संजय जाधव मीनाज हॉटेल रियाज पटेल आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने भडकल गेट येथे श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
What's Your Reaction?






