आता मनपाच्या प्रत्येक झोन कार्यालयाला डिसल्टींग मशिन

आता प्रत्येक झोन कार्यालयाला डिसल्टींग मशीन...
वर्धापन दिनानिमित्त नवीन डिसल्टींग मशीनचे लोकार्पण
औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या 41 व्या वर्धापन दिना निम्मित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका यांत्रिकी विभागाच्या वतीने ड्रेनेज विभगाचे सक्षमीकरण करणे करिता एकूण 9 डिसल्टींग मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत. या अगोदर सहा डिसल्टींग मशीन खरेदी करण्यात आल्या होत्या. यात अजून 3 डिसल्टींग मशीनची भर पडली आहे यामुळे आता प्रत्येक झोन कार्यालयाला स्वतंत्र
डिसल्टींग मशीन प्राप्त झाल्या असून आता ड्रेनेज लाईन मेन होल मध्ये उतरून मलबा काढणे सोपे झाले आहे. या मशीन द्वारे आता मेनहोल मध्ये जवळपास 30 ते 40 फूट उतरून मालबा काढता येणार आहे.या मशीनची किंमत जवळ पास 11 लक्ष रुपये असून पुणे येथील कॅम अव्हिंग एन्व्हायरो इंजिनिअरिंग या कंपनीने या मशीन बनविल्या आहेत.
आज या नवीन तीन डिसल्टींग मशीनचे लोकार्पण मनपा मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील,सौरभ जोशी,शहर अभियंता ए.बी देशमुख,मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे,कार्यकारी अभियंता यांत्रिकी अमोल कुलकर्णी,मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, व इतर सर्व विभाग प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






