जालना लोकसभा मतदारसंघात अंतिम 69.18 टक्के मतदान
जालना लोकसभा मतदारसंघात 69.18 टक्के मतदान
जालना, दि. 14(डि-24 न्यूज) लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जालना लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी उत्साहात मतदान पार पडले. एकूण 69.18 टक्के मतदान झाले. जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृतीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांना प्रतिसाद देत प्रशासनाच्या आवाहनाला दाद देऊन मतदारांनी उर्त्स्फूतपणे मतदान केले.
सोमवार, दिनांक 13 मे 2024 रोजी जालना लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. जालना लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.
जालना- एकूण मतदार संख्या पुरुष 1,73,975, महिला 1,54,222 व इतर 35 असे एकूण 3,28,232 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या पुरुष 1,09,103, महिला 90,777 व इतर 6 असे एकूण 1,99,886 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 62.71 टक्के, महिला 58.86 टक्के व इतर 17.14 टक्के अशा एकूण 60.90 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
बदनापूर- एकूण मतदार संख्या पुरुष 1,68,340, महिला 1,53,548 व इतर 5 असे एकूण 3,21,893 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या पुरुष 1,25,012, महिला 1,06,135 व इतर 1 असे एकूण 2,31,148 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 74.26 टक्के, महिला 69.12 टक्के व इतर 20 टक्के असे एकूण 71.81 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
भोकरदन –एकूण मतदार संख्या पुरुष 1,62,987, महिला 1,49,038 व इतर 0 असे एकूण 3,12,025 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या पुरुष 1,23,516, महिला 1,08,176 व इतर 0 असे एकूण 2,31,692 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 75.78 टक्के, महिला 72.58 टक्के व इतर 0 टक्के असे एकूण 74.25 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
सिल्लोड - एकूण मतदार संख्या पुरुष 1,79,017, महिला 1,60,826 व इतर 4 असे एकूण 3,39,847 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या पुरुष 1,25,929, महिला 1,08,108 व इतर 2 असे एकूण 2,34,039 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 70.34 टक्के, महिला 67.22 टक्के व इतर 50 टक्के असे एकूण 68.87 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
फुलंब्री - एकूण मतदार संख्या पुरुष 1,84,985, महिला 1,66,819 व इतर 4 असे एकूण 3,51,808 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या पुरुष 1,31,188, महिला 1,10,860 व इतर 1 असे एकूण 2,42,049 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 70.92 टक्के, महिला 66.46 टक्के व इतर 25 टक्के असे एकूण 68.80 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
पैठण - एकूण मतदार संख्या पुरुष 1,64,802, महिला 1,48,963 व इतर 4 असे एकूण 3,13,769 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या पुरुष 1,21,127, महिला 1,01,278 व इतर 1 असे एकूण 2,22,406 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 73.50 टक्के, महिला 67.99 टक्के व इतर 25 टक्के असे एकूण 70.88 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
What's Your Reaction?