रस्ता रुंदीकरणास दौलताबादकरांचा विरोध...

रस्ता रुंदीकरणास दौलताबादकरांचा विरोध...
ग्रामपंचायतने घेतला ठराव, पर्यायी चारपदरी रस्ता होणार असल्याने रहदारीचा प्रश्न मार्गी लागेल, विभागीय आयुक्तांना दिले निवेदन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज), दि.23(डि-24 न्यूज) -
शहरात अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर विकास प्राधिकरण मार्फत महामार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला. शहराच्या वर्दळीच्या गावातून जे रस्ते जात आहे. दळणवळणासाठी या रस्त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो असे वाळूज, दौलताबाद, करमाड, शेंद्रा, सावंगी व सुलिभंजन, वेरुळ असे एकूण दहा गावातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे व रस्ता रुंदीकरण केले जाणार आहे. या रुंदीकरणाला दौलताबाद ग्रामपंचायतने विरोध केला आहे. या रस्त्यावर असलेल्या व्यवसायावर रुंदीकरणाचा परिणाम होईल. देवगिरी किल्ला येथे असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. येथून खुलताबाद व वेरूळ येथे जातात. येथे 50 फुटावर मार्कींग करण्यात आली आहे ती योग्य आहे. रुंदीकरणात अधिकचे 25 फुट वाढवू नये अशी मागणी आज विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना निवेदनाद्वारे सरपंच सौ.शबाना करीम शेख व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. यावेळी आब्दीमंडी गावाबाहेरुन दौलताबाद घाटापर्यंत चार पदरी नवा रस्ता होणार आहे यामुळे रहदारीचा प्रश्न सुटेल अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी उपसरपंच सैय्यद मतीन, ग्रामपंचायत सदस्य सैय्यद लईकोद्दीन, सैय्यद शेरु, दिपक घुसळे, शेख बाबा शेख सत्तार, शेख लाला शेख रहेमान, शेख तौफीक शेख सत्तार उपस्थित होते.
ग्रामसभेत काय घेतला ठराव...दौलताबाद टि पाॅईंट ते वेरुळ रस्ता रुंदीकरण...
सभेत सुचक यांनी सूचना मांडली की छत्रपती संभाजीनगर विकास प्राधिकरणामार्फत छत्रपती संभाजीनगर शहरालगतचे प्राधिकरणाच्या हद्दीतील एकूण दहा रस्त्यांची रुंदीकरण करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. प्राधिकरणामार्फत तशा सूचना वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेली आहे. त्यामध्ये वरील दहा रस्त्यांमध्ये दौलताबाद टी पाॅईंट ते वेरुळ रस्त्याचा समावेश आहे. व सदरील रस्त्यावर ऐतेहासिक देवगिरी किल्ला असलेले दौलताबाद गाव आहे. सद्या स्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ता रुंदीकरणासाठी मुख्य रस्त्याच्या मध्यापासून 50 फुटापर्यंत मार्किंग केली आहे. खुणा करण्यात आल्या आहेत. यानंतर प्राधिकरण मार्फत वेगळी मार्कींग करण्यात येणार असल्याचे समजते. प्राधिकरणामार्फत जास्तीची जागा संपादीत केल्यास गावातील रस्त्यावरील अनेक मालमत्ता बाधित होणार आहे. गावातील रोजगार उपजिविका संपुष्टात येणार आहे व गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तरी सदरील नुकसान टाळण्यासाठी सदरील रस्ता जास्तीचा रुंद करण्यात येवू नये. रस्त्यालगतची कच्ची बांधकामे टप-या शेड हटवली. शहरी रस्ता रुंद होऊन रहदारीचा प्रश्न यापैकी सुटेल व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे अब्दीमंडी गावाबाहेरुन दौलताबाद घाटापर्यंत नव्याने मोठा चार पदरी रस्ता होणार आहे. सदरील रस्ता पूर्ण झाल्यानंतर दौलताबाद गावातून जाणा-या रस्त्यावर जास्त रहदारी राहणार नाही असे ठरावात म्हटले आहे.
What's Your Reaction?






