राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात भाजपाने केले जोडेमारो आंदोलन
राहुल गांधी यांच्या वक्तव्या विरोधात भाजप कडून जोरदार निषेध...
गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांची उपस्थिती...
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षण संदर्भात केलेल्या वक्त्यव्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी जोरदार निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. यावेळी गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे आणि शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक याठिकाणी हे आंदोलन करण्यात आले होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत एका ठिकाणी चर्चा करत असताना देशात आरक्षण मुळे अनेक गोष्टीला न्याय मिळत नाही. आम्ही लवकरच आरक्षण रद्द करू असे बेताल वक्तव्य केले होते. या बाबत भाजप कडून निषेध नोंदवण्यात आला असून यावेळी राहुल गांधी यांच्या फोटोवर महिला मोर्चाच्या वतीने जोडे मारत जोरदार आंदोलन करण्यात आले. या राहुल गांधी चे करायचे काय खाली मुंडके वर पाय, अशा घोषणांनी परिसर पूर्णपणे दणाणून गेला होता.
यावेळी बोलतांना राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे म्हणाले की, संविधान मध्ये हस्तक्षेप करणारी विचार सरणी असलेल्या काँग्रेसचा आम्ही धिक्कार करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. अशा व्यक्तव्य करण्याला समाज कधीच माफ करणार नाही तसेच त्यांचे हे वक्तव्य पूर्णपणे बेताल असल्याचे मंत्री श्री अतुल सावे यांनी सांगितले.
यावेळी जालिंदर शेंडगे, मनोज पांगारकर, प्रसाद कोरके, सुनील उपाध्याय, बबन नरवडे, लक्ष्मण शिंदे, रामेश्वर भादवे, रामचंद्र जाधव, भदाने पाटिल, रवि ऐडके, नितिन खरात, संजय मंत्री, सौ. विजया भोसले, सौ. गीता कपुरे, सौ. अनिता भोकरे, सौ. जयश्री किवळेकर सौ. किवेळेकर ताई सर्व शहर पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, मोर्चाचे अध्यक्ष, महिला मोर्चा पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?