राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरविंदरसिंह मारवाला अटक करा, काँग्रेस रस्त्यावर
 
                                लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा भाजप नेता तरविंदरसिंह मारवा यांच्यावर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करावी या मागणीसाठी काँग्रेसने केले आंदोलन, पोलिस आयुक्तांना दिले निवेदन...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.13(डि-24 न्यूज) दिल्ली भाजपचा नेता माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याने लोकसभा विरोधी पक्षनेते, खासदार राहुलजी गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग व बलिदान दिले आहे. देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी यांचे बळी घेतले आहेत. आता पुन्हा गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे व भाजपाचे सरकार मात्र त्यावर काहीही कारवाई करत नाही हे अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह आहे.
खासदार राहुलजी गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणार्या भाजपाचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा व भारतीय जनता पक्षाच्या विरोधात पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे सकाळी 11 वाजता जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.कल्याण काळे व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा तीव्र निषेध व आंदोलन करण्यात आले. भाजप सरकार मुर्दाबाद, तरविंदरसिंह मारवा मुर्दाबाद अशा घोषणांनी आजुबाजुचा परिसर दणाणुन सोडला.
यावेळी जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.कल्याण काळे व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, महाराष्ट्र प्रदेश सेवालदाचे अध्यक्ष विलासबापु औताडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ.जफर अहेमद खान, महाराष्ट्र प्रदेश कॉगे्रस कमिटीचे सरचिटणीस डॉ.जितेंद्र देहाडे, रोजगार स्वयंरोजगार प्रदेश अध्यक्ष योगेश मसलगे पाटील, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष इब्राहीम पठाण, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाब पटेल, अॅड.सयद अक्रम, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर नागरे, महिला शहर अध्यक्षा दिपाली मिसाळ, डॉ.अरुण शिरसाठ, अनिस पटेल, मोईन ईनामदार, शेख अथर, मोहित जाधव, गौरव जैस्वाल, जयप्रकाश नन्नावरे, अनिता भंडारी, मसरुर सोहेल खान, आसमत खान, मोईन कुरैशी, इरफार पठाण, शेख रईस, इरफान गुलाब खान, रवि लोखंडे, प्रमोद सदाशिवे, सुर्यकांत गरड पाटील, मजाज खान, मंजु लोखंडे, विदया घोरपडे, शिखरे ताई, परवनी बाजी देशमुख, सयद रूबीना, रेहाना बाजी, विनायक सरवदे, सुनिल डोणगांवकर, इंजि.इपतेखार शेख, सलमान खान, प्रा.रमाकांत गायकवाड, योगेश थोरात, संजय धर्मरक्षक, योगेश बहादुरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
 
                        
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            