काँग्रेसने केले क्रांतीचौकात आंदोलन, पोलिस आयुक्तांना दिले निवेदन

 0
काँग्रेसने केले क्रांतीचौकात आंदोलन, पोलिस आयुक्तांना दिले निवेदन

काँग्रेसने केले क्रांतीचौकात आंदोलन, पोलिस आयुक्तांना दिले निवेदन

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.28(डि-24 न्यूज) सिंधूदूर्ग जिल्ह्यातील मालवन येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाखाली साखळी आंदोलन शहराध्यक्ष युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

यावेळी हात जोडून माफ करा, माफ करा, राजे आम्हास माफ करा, या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. पुतळ्याच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. याप्रकरणी बांधकाम ठेकेदार व महायुती सरकारवर गुन्हा दाखल करावे या मागणीचे निवेदन पोलिस आयुक्त प्रविण पवार यांना शिष्टमंडळाने दिले.

यावेळी शहराध्यक्ष युसुफ शेख, प्रदेश महासचिव डॉ. जफर अहमद खान, माजी शहराध्यक्ष इब्राहिम पठाण, महीला काँग्रेसच्या प्रदेश सचिव सरोज मसलगे पाटील, प्रवक्ते मसरुर खान, महीला शहराध्यक्ष दिपाली मिसाळ, डॉ.जितेंद्र देहाडे, डॉ.पवन डोंगरे, अरुण सिरसाठ, डॉ .सरताज पठाण, भाऊसाहेब जगताप, रईस शेख, संजय धर्मरक्षक, साहेबराव बनकर, एम.ए.अझहर, कैसर बाबा, इद्रीस नवाब, विनायक सरवदे, शिला मगरे, शेख सलिम, सुनील डोणगावकर, अजमत खान, मोईन कुरेशी, प्रमोद सदाशिवे, रुबीना सय्यद, रवी लोखंडे, समिना सय्यद, चंद्रप्रभा खंदारे, सय्यद फयाजोद्दीन, स्वाती बसू,जयसिंग होलिये, मंजू लोखंडे, विद्या घोरपडे, शफीक शहा आदी उपस्थित होते

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow