शहरात पद्म फेस्टिवलचे 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान आयोजन...
पद्म फेस्टिवलचे 5 ते 7 नोव्हेंबरदरम्यान आयोजन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)-
पद्म फेस्टिवलचे येत्या 5 ते 7 नोव्हेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ज्ञानयज्ञ फाऊडेशनच्या वतीने शनिवार, 25 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत देण्यात आली. तीन दिवस चालणाऱ्या पद्म फेस्टिवलमध्ये एकाच ठिकाणी पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांना एकाच ठिकाणी ऐकण्याची संधी छत्रपती संभाजीनगरकरांना मिळणार आहे. पद्म फेस्टिवलचे उद्घाटन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्डचे सदस्य तथा निवृत्त लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग, डॉ. पद्मा सुब्रहमण्यम, कल्याणसिंग रावत, प्रेमजित बारिया यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रह्मण्यम, बुध्दिबळपटू भाग्यश्री साठे, तबला वादक पंडित सुरेश तळवलकर, डीक्कीचे चेअरमन रवि कुमार नर्रा, इस्त्रोचे माजी अध्यक्ष ए.एस.किरण कुमार, पॅरालिंपिक जलतरणपटू मुरलीकांत पेटकर, पर्यावरणवादी कल्याणसिंह रावत, पितळ नक्काशी कलाकार दिलशाद हुसेन, हेरिटेज स्केच कलाकार प्रेमजीत बारिया, आयार्य सुकामा, डॉ. विलास डांगरे, सुभाष शर्मा या 12 पद्म पुरस्कार प्राप्त विजेत्यांना ऐकण्याची संधी मिळणार असल्याची माहिती ज्ञानयज्ञ फाऊंडेशनतर्फे यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेस महेश सहस्रबुद्धे, पद्मश्री केंडे, सर्जन कॅप्टन मोहन रोटे, अतुल चपळगावकर, ॲड. साई महाशब्दे, आयुष अग्रवाल, संदीप लंके आदींची यावेळी उपस्थिती होती. पद्म फेस्टिवलच्या अधिक माहितीसाठी अतुल चपळगावकर, साई महाशब्दे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन यावेळी ज्ञानयज्ञ फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले.
What's Your Reaction?