कैलासनगरचे नागरीक रस्त्यावर...

कैलासनगरचे नागरीक रस्त्यावर...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) -
चंपा चौक ते जालना रोड 30 मीटर शंभर फुट रस्ता रुंदीकरण होणार आहे. या रस्त्यांमध्ये सुमारे 900 निवासी व दुकाने बाधित होणार आहे यामुळे येथील नागरीक भयभीत झाले आहे. हा रस्ता डिपी प्लॅन मधून वगळून अजमेरा हाॅटेल पासून टर्न करावा. येथे गरीब व मोलमजूरी करणारे लोकांची घरे आहे. रुंदीकरणाच्या नावावर राजकारण करुन गरीबांना बेघर करु नका या मागणीसाठी रात्री आठ वाजेच्या सुमारास येथील शेकडो नागरीकांनी कुटुंबासह रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. सरकार व मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांनी आरोप लावला गरीबांना बेघर करण्याचे षडयंत्र करण्यात आले. तीनदा डिपी प्लॅन बदलण्यात आला. येथील नागरीकांची मागणी नसताना मनमानी करत रस्ता मोठा करण्याचा मनपा प्रशासन प्रयत्न करत आहे. येथे आम्ही बुलडोझर कार्यवाही होवू देणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत पावसाळ्यात अतिक्रमण हटवण्याची कार्यवाई करु नये. आमच्याकडे पीआर कार्ड आहे मालकी हक्काची हि घरे आहे. आम्ही अतिक्रमण केलेले नाही आम्ही न्यायालयात गेलो आहे. तीन आठवड्याचा वेळ मिळाला आहे. गरीबांचे घरे वाचवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार आहे. आयुक्तांना विनंती आहे आमच्याशी चर्चा करावी. काही राजकारणी व लोकप्रतीनीधी यांच्या मालमत्ता रस्ता रुंदीकरणात यावे म्हणून हा खटाटोप आम्हाला विश्वासात न घेता सुरु आहे असा आरोप आंदोलकांनी लावला. हा रस्ता रद्द करावा. पावसाळ्यात भाड्याने सुध्दा घरे मिळणार नाही हि परिस्थिती आहे आम्ही कोठे जावे. एका घरात पाच व्यक्ती धरले तरी हजारो लोकांचा राहण्याचा उदरनिर्वाहाचा मोठे संकट आहे. आयुक्तांनी निर्णय बदलावा व आम्हाला बेघर करु नये अशी विनंती आंदोलकांनी केली आहे.
What's Your Reaction?






