उद्यापासून 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह...

 0
उद्यापासून 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह...

उद्या पासून ‘महसूल सप्ताह’

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.30 (डि-24 न्यूज) - राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाचे उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे तसेच महसूल विषयक जनजागृती करणे,असा आहे.

यानिमित्त दि.1 ते 7 दरम्यान आयोजीत कार्यक्रम याप्रमाणे-

शुक्रवार दि.1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समांरभ होणार आहे.

शनिवार दि.2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबाना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रम 

रविवार दि.3 ऑगस्ट रोजी पाणंद, शिवरस्त्यांची मोजणी करनु त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे. 

सोमवार दि.4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे.

मंगळवार दि.5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे.

बुधवार दि.6 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार नियमानुकूल करणे, सरकारजमा करणे, निर्णय घेणे.

गुरुवार दि.7 ऑगस्‍ट रोजी महिला प्रवाशांसाठी सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः बस स्थानकांवर उभारण्यात येणारे स्वच्छतागृह व विश्रांतीगृह धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे प्रमाणित कार्यपद्धतीनुसार धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ करण्यात येणार आहे.या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यात सहभागी व्हावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow