अर्धे कटकट गेट अंधारात, हर्सुलजवळ केबल जळाली
 
                                अर्धे कटकट गेट अंधारात, हर्सुलजवळ केबल जळाली
औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) हर्सुल जवळ केबल जळाल्याने पाच ते सहा वार्डाची वीज गुल झाल्याने वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. अर्धे कटकट गेट अंधारात आहे. एमआयएमचे सलिम सहारा यांनी अधिका-यांना फोन केला त्यांनी फोन उचलला नाही. न्यू एसटी काॅलनी, नाहिदनगर, शताब्दीनगर, टिव्ही सेंटर, हडकोत रात्री दिड वाजेपासून वीज गुल झाली आहे. डासांचा प्रकोप, पंखे बंद असल्याने घाम फुटत असल्याने झोप उडाली आहे. सलिम सहारा व रफीक पालोदकर यांनी हर्सुल पाॅवर स्टेशन वर धाव घेतली व अधिका-यांशी चर्चा केली व लवकर दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी रात्री तीन वाजेपासून ठाण मांडून बसले आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरीकांना रात्री त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे
 
.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            