एमआयएम समोर सहा पक्ष तरीही इम्तियाज जलील गरीबांची आवाज पुन्हा संसदेत पाठवण्याचे ओवेसींचे भावनिक आवाहन

 0
एमआयएम समोर सहा पक्ष तरीही इम्तियाज जलील गरीबांची आवाज पुन्हा संसदेत पाठवण्याचे ओवेसींचे भावनिक आवाहन

एमआयएम समोर सहा पक्ष तरीही इम्तियाज जलील गरीबांची आवाज पुन्हा संसदेत पाठवण्याचे ओवेसींचे भावनिक आवाहन- ओवेसी

ओवेसींची मोदी सरकार व उध्दव ठाकरे यांच्यावर टीका...जलिल यांनी ठेवला भाईचारा कायम...

वैजापूर, दि.15(डि-24 न्यूज) इम्तियाज जलील यांनी गेल्या पाच वर्षांत गरीबांची आवाज बुलंद करत संसदेत पोटतिडकीने प्रश्न उपस्थित केला. मराठा आरक्षणाचा मुद्दा असो कि धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न. शेतकऱ्यांची आवाज बनले तर कधीही हिंदू - मुस्लिमचे राजकारण केले नाही. सर्व समाजासाठी काम केले. शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाचे चार वेळा खासदार असलेले चंद्रकांत खैरे यांचे नाव न घेता खान पाहिजे की बाण या मुद्यावर निवडणुका गाजल्या पण या निवडणुकीत त्यांचे बाण निशाणी गायब झाल्याने त्यांना हिंदू-मुस्लिम-सिख-ईसाई सब भाई भाई म्हणत सलाम करत आहे. ईदनिमित्त ईदगाहवर आल्याने जाहीर सभेत उध्दव ठाकरे व खैरेंवर निशाणा साधला. सिएए, ट्रीपल तलाक, युएपिए कायद्याला शिवसेनेने मोदी सरकारला पाठिंबा दिला होता हे विसरता येणार नाही. बाबरी मस्जिद पाडली असे ठणकावून सांगितले होते. आता गरज पडली तर मुस्लिम समाजाला जवळ करत आहे यांच्यावर विश्वास ठेऊ नका. इम्तियाज जलील हेच एकमेव उमेदवार आहेत जे जातीपातीचे राजकारण करत नाही. एकीकडे राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत दुसरीकडे सत्ताधारी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेला इलेक्ट्रोल बाॅण्डच्या माध्यमातून हजारो कोटी मिळाले आहे. एमआयएम एकमेव पक्ष असा आहे एकाही सेठने खरीदण्याची हिंमत केली नाही. आम्ही जेम्स बाॅण्ड आहे आम्हाला इलेक्ट्रोरल बाॅण्ड नाही हवे तर जनतेची सेवा करण्याचा बाॅण्ड केलेला आहे. म्हणून एकमेव पक्ष असा आहे कि पक्षांतराची किड लागलेली नाही. जनतेच्या मतांवर निवडून यायचे सकाळी एका पक्षात संध्याकाळी दुसऱ्या पक्षात असे महाराष्ट्रात झाले असल्याने त्यांनी टिका केली. महागाई, बेरोजगारी सारखे ज्वलंत मुद्दे समोर असताना मोदी सरकारने पाऊले उचलली नाहीत. भाजपा, काँग्रेस, दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी हे सहा पक्ष एमआयएम समोर आहेत इम्तियाज जलील यांना या लोकसभेच्या निवडणुकीत आव्हान देण्यासाठी परंतु जनता हुशार आहे काम करणाऱ्या उमेदवाराला पतंगाचे बटन दाबून विजयी करण्याचे भावनिक आवाहन ओवेसींनी केले. मतदारसंघाच्या विकासासाठी 2019 हून जास्त विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी जाहीर सभेत एमआयएमचे सुप्रीमो बॅ.असदोद्दीन ओवेसी यांनी केले. यावेळी इम्तियाज जलील यांचेही भाषण झाले. व्यासपीठावर प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफार कादरी, जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, औरंगाबाद शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी व स्थानिक नेते उपस्थित होते

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow