तयारी लोकसभेची... उद्या महायुतीचा मेळावा...!

 0
तयारी लोकसभेची... उद्या महायुतीचा मेळावा...!

तयारी लोकसभेची... उद्या महायुतीचा मेळावा

औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) उद्या 14 जानेवारी 2024, रविवारी सकाळी 10.30 वाजता निराला बाजार येथील तापडिया नाट्य मंदिर येथे महायुतीच्या 14 घटक पक्षांचा मेळावा होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली आहे.

याप्रसंगी भाजपाचे महामंत्री तथा प्रदेश महासचिव संजय केनेकर यांनी सांगितले देश आणि राज्य विकासाकडे जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला पाहिजे यासाठी उद्या महायुतीच्या होणा-या मेळाव्यात महायुतीचे नेते मार्गदर्शन करणार आहेत.

या मेळाव्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, रोहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय सिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार प्रशांत बंब, आमदार प्रा.रमेश बोरनारे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे व महायुतीचे खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

या पत्रकार परिषदेला अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहराध्य अभिजित देशमुख, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, शहराध्य नागराज गायकवाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाट, जालिंदर शेंडगे, शिवसेनेचे ॠषीकेश जैस्वाल, व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow