शहरात घरेलू गॅस सिलिंडरची टंचाई, चालकांच्या संपामुळे वाहतूक बंद

 0
शहरात घरेलू गॅस सिलिंडरची टंचाई, चालकांच्या संपामुळे वाहतूक बंद

शहरात घरेलू गॅस सिलिंडरची टंचाई, चालकांच्या संपामुळे वाहतूक बंद

औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) गॅस सिलिंडर व इंधनाचा पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी स्टेरींग छोडो आंदोलन सुरू केल्याने शहरात घरगुती गॅस सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक दोन दिवसांपासून त्रस्त झाले आहेत. कमर्शियल गँस पुरवठा होत नसल्याने व्यवसाय करणाऱ्यांना पण याचा फटका बसला आहे. ज्या हाॅटेल चालकाला दररोज दोन टाकी लागते त्यांना एकच सिलेंडर मिळत असल्याने व्यवसायावर परिणाम होत आहे. चालक संघटनांची बैठक शासन स्तरावर सुरु असल्याची माहिती डि-24 न्यूजला मिळाली आहे.

गॅस सिलिंडरसाठी दोन दिवसांपासून एजंसीकडे ग्राहक चकरा मारत आहे. काही एजंसीवर स्टाॅक संपल्याने स्वयंपाकासाठी गृहीनींना त्रास सहन करावा लागत आहे.

ग्राहक इम्रान खान मसूद यांनी सांगितले दोन दिवसांपासून यशोधरा काॅलनी येथील गॅस एजंसीवर चकरा माराव्या लागत आहे आज शनिवारी पण सिलेंडर मिळाले नसल्याने हाॅटेल वरून जेवन आणावे लागत आहे.

आज 4 वाजता सिलेंडर मिळेल असे एजंसी चालकाने सांगितले. प्रशासनाने हि टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करावे, पुरवठा विभागाने हि समस्या दूर करावी अशी मागणी केली आहे.

एजंसीचे व्यवस्थापक याने सांगितले की दोन दिवसांपासून सिलेंडरची गाडी येत असल्याने हि समस्या निर्माण झाली आहे. दररोज आम्हाला ग्राहकांना देण्यासाठी तीनशे सिलेंडर लागतात परंतु स्टाॅक मिळत नसल्याने हि समस्या निर्माण झाली आहे लवकरच शासनाच्या वतीने यावर तोडगा निघणार आहे. शासन स्तरावर बैठक सुरू आहे त्यानंतर सिलेंडरचा पुरवठा पर्ववत होणार आहे. ग्राहकांनी काळजी करु नये. सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत कधी होणार याची प्रतिक्षा आहे.

पेट्रोलियम डीलर्स असोशिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी सांगितले की शहरात इंधनाचा पुरवठा अगोदरच करण्यात आलेला आहे. वाहनधारकांना त्रास होणार नाही. पेट्रोल डिझेल भरपूर आहे. पेट्रोल पंपावर गर्दी नाही. इंधन पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरु आहे असे त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow