मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत भुकंपाचे सौम्य धक्के, 4.5 तीव्रता
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त माहिती...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.10(डि-24 न्यूज)
आज रोजी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे 4.5 इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद सकाळी 7.15 वाजता झाली. सदर भूकंपाचे सौम्य धक्के नांदेड ,परभणी, वाशिम व छत्रपती संभाजीनगर इत्यादी जिल्ह्यांमध्ये जाणवली. पैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तहसीलदार ग्रामीण यांनी दिलेल्या वृत्तानुसार घारेगाव एकतूनी, फारोळा ,पांढरे पिंपळगाव, पिंपरी राजा, आडगाव खुर्द या गावांमध्ये भूकंपाचे सौम्ये धक्के जाणवले तर पैठण तालुक्यांत पाचोड ,विहामांडवा येथे सुद्धा धक्के जाणवले असल्याचे वृत्त या कार्यालयास संबंधित तहसीलदार यांनी कळवले. तथापि, सर्व तलाठी व मंडळ अधिकारी गावातून माहिती घेत आहेत.
मराठवाडा, विदर्भ मध्ये 4 री.स्के. चा भूकंप
हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात भूकंपाचे जोरदार धक्के, हिंगोली औंढा नागनाथ, सेनगाव, कळमनुरी, वसमत या तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर, सकाळी 7.15 वाजता सौम्य धक्का, नागरिकांमध्ये भीतीच वातावरण..
.
What's Your Reaction?