दोन बांधकाम व्यावसायिकांना 50 हजार रुपये दंड, रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणे पडले महागात

 0
दोन बांधकाम व्यावसायिकांना 50 हजार रुपये दंड, रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणे पडले महागात

दोन बांधकाम व्यावसायिक यांना 50 हजार रुपये दंड...

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.9(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने शहरातील दोन बांधकाम व्यावसायिक यांचे कडून 50 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरात बांधकाम साहित्य रस्त्यावर पडलेले असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो तसेच यामुळे प्रदूषण होते या करिता आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार शहरात यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे. कोणतेही बांधकाम चालू असताना त्यामुळे प्रदूषण होऊ नये म्हणून ग्रीन नेट लावण्यात यावी हा नियम आहे. 

उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख रवींद्र जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली व नागरिक मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नियंत्रणात स्वच्छता निरीक्षक आणि नागरिक मित्र पथकाचे माजी सैनिक यांचे दहा झोन कार्यालयांतर्गत पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकाकडून झोनमधील प्रत्येक बांधकाम व्यावसायिक यांचे सुरू असलेल्या बांधकामांची तपासणी केली जात आहे. त्यापैकी झोन क्र.3 गणेश कॉलनी व 7 व्यकंटेश नगर याठिकाणी 2 बांधकाम व्यावसायिक यांच्या वर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

 बांधकाम व्यावसायिक यांनी ग्रीन नेट न लावणे, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण करणे व नियमांचे पालन न केल्यामुळे 25 हजार रुपये प्रत्येकी असे 50 हजार रुपये बांधकाम व्यावसायिक यांचे वर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई नागरी मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव ,सबंधित स्वच्छता निरीक्षक,जवान व मित्र पथकाचे कर्मचारी यांनी पार पाडली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow