विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याला एक लाखाची लाच घेताना पकडले
विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याला एक लाखाची लाच घेताना पकडले
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.10(डि-24 न्यूज) कन्नड विभागाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांने साडेतीन लाखांच्या लाचेची मागणी केली. अगोदर दिड लाख रुपये घेतले असून तडजोड अंती दोन लाख मधून तडजोड अंती एक लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
लाच घेणाऱ्या अभियंत्यांचे नाव प्रविण कचरु दिवेकर, कन्नड विभाग, राहणार प्लाॅट नं.40, चिनार गार्डनमागे, पडेगाव, छ.संभाजीनगर(वर्ग 2).
तक्रारदार यांनी केलेले कामाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आरोपी लोकसेवक रामगुडे व दिवेकर यांनी तक्रारदार यांचेकडे साडेतीन लाखांची मागणी करुन यापूर्वी दिड लाख रुपये घेतले असून उर्वरित दोन लाख रुपयांपैकी तजजोड करुन एक लाख रुपये स्विकारण्याचे मान्य करुन आज रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कन्नड विभागाचे कार्यालयात लाच रक्कम आरोपी रामगुडे व आरोपी प्रविण दिवेकर यांच्या कक्षात स्विकारली असता दोघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक लाचलुचपत विभाग, संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलिस उप अधीक्षक राजीव तळेकर, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक अमोल धस, सापळा पथक पोअ युवराज हिवाळे, रवींद्र काळे, आत्माराम पैठणकर, चालक पोअ बागुल यांनी हि कारवाई केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरीकांना आवाहन केले की भ्रष्टाचार संबंधित काही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक 1064, पोलिस अधीक्षक यांचा मोबाईल नंबर 9923023361 वर संपर्क करावा.
What's Your Reaction?